Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी मजेशीर गमती जमतीचे व्हिडीओ सोशल मीडिया शेअर करतात तर कधी कोणी भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तुम्ही शाळेतील अनेक आठवणींना उजाळा देणारे व्हिडीओ पाहिले असतील पण सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हा चिमुकला घरच्यांपासून दूर होस्टेलवर राहायला जात आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. काही लोकांना अश्रु अनावर होणार नाही.
हेही वाचा : रतन टाटांचे इन्स्टाग्रामवर मिलियन फॉलोवर्स; मात्र ते ‘या’ एकाच अकाउंटला करत होते फॉलो
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दिसेल जो रडत रडत बॅग पॅक करताना दिसत आहे. त्यानंतर तो त्याच्या आईसमोर रडताना दिसतो. तेव्हा आई त्याचे अश्रु पुसते पण तिला स्वत:सुद्धा अश्रु अनावर होतात. त्यानंतर पुढे हा चिमुकला बॅग पाठीवर धरतो. त्यानंतर तो त्याच्या बहिणीला घेऊन दादाच्या दुचाकीवर बसतो. बहिण व दादा त्याला सोडायला जातात. त्यानंतर तो होस्टेलवर जेवण करताना दिसतो. पुढे व्हिडीओत गेटवर उभी राहुन बहिण त्याचा निरोप घेते तेव्हा तो चिमुकला बहिणीचा लाड करताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. काही लोकांना व्हिडीओ पाहून रडू येईल तर काही लोकांना त्यांचे बालपणीचे दिवस आठवतील.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
jnv_family_school या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कॅप्शनची गरज नाही फक्त समजून घ्या. कोण कोण नवोदयमध्ये आल्यानंतर रडले. समजत नाही की येताना पण रडतात आणि जाताना पण रडतात.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला माझ्या होस्टेलच्या दिवसांची आठवण आली पण हे दिवस निघून जातात. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते.” तर एका युजरने लिहिलेय, “गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी….” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही माझी स्टोरी आहे. मी सुद्धा वयाच्या ११ व्या वर्षी असेच घर सोडले होते.” हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सना त्यांचे बालपणीचे, होस्टेलचे दिवस आठवेन. काही लोक व्हिडीओ पाहून भावूक झाले आहे. त्यांनी कमेंटमध्ये हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
जेएनव्ही म्हणजेच जवाहर नवोदय विद्यालय ही देशातील सरकारी शाळा आहे. या शाळेत प्रवेश करण्यासाठी असंख्य विद्यार्थी अर्ज करतात. या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे राहणे, खाणे अगदी मोफत होते. पण प्रवेशासाठी नवोदय समितीद्वारे घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. वरील व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसले की चिमुकला या परिक्षेत पास झाला आणि त्याला जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला. त्यामुळे तो घर सोडून नवोदय होस्टेलवर राहायला गेला आहे.