केंद्र सरकारद्वारे करण्यात आलेल्या चौकशीत काही शीतपेयांमध्ये घातक रसायने असल्याचे समोर आले आहे. या शीतपेयांमध्ये एंटीमोनी, क्रोमियम, कैडमियम यासारखे घातक असे रासायनिक पदार्थ असल्याचे समोर आले. यानिमित्ताने परदेशात पेप्सिको कंपनीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका खटल्याची सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
अमेरिकेतल्या रोनाल्ड बॉल नावाच्या व्यक्तीने माऊंटन ड्यू विरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. यात आपण घेतलेल्या माऊंट ड्यू या शीतपेयात उंदीर विरघळा असल्याचा दावा त्याने केला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. आपण ऑफिसच्या कँटीनमधून माऊंटन ड्यू हे शीतपेय घेतले होते. ज्याची चवही अतिशय वाईट होती आणि हे शीतपेय प्यायल्यानंतर आपण आजारी पडलो असल्याची माहिती रोनाल्ड यांनी दिली. तसेच यासाठी नुकसान भरपाईची मागणीही त्यांनी केली होती. या व्यक्तीने याआधी कंपनीला शीतपेयात विरघळलेले उंदीर आणि पत्र पाठवून तक्रार केली असल्याचेही सांगितले होते. या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना या कंपनीने पेयातील घटकामुळे उंदीर आत विरघळतो असे सांगितले होते. या प्राण्याचे मृत शरीर या पेयाच्या संपर्कात आल्यानंतर काही दिवसांत जेली सारख्या पदार्थात त्याचे रुपांतर होत असल्याचे कंपनीने म्हटले होते. पण ही प्रक्रिया पार पडण्यास तीस दिवसांचा अवधी लागत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले होते. २००९ मधली हे प्रकरण आहे. पण  न्यायालयात कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या सील पॅक बॉटलमध्ये उंदीर सापडल्याचे कोणतेही पुरावे रोनॉल्ड यांना देता आले नाही त्यामुळे हे प्रकरण तिथेच बंद झाले. पण खटल्यादरम्यान आपल्या शीतपेयात उंदीर किंवा प्राणी विरघळत असल्याची कबुली दिल्याने उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या.

Story img Loader