आपल्या लहानपणी ज्यांच्या हाताचं बोट पकडून आपण चालायला शिकलो त्यांच्यासोबतच मोठं झाल्यावर सुद्धा एकत्र काम करण्याचा अनुभव काही निराळाच. अगदी असाच अनुभव घेणाऱ्या पायलट बाप-लेकाच्या जोडीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये पायलट बाप-लेक कॉकपिटमध्ये बसण्याचा अनुभव शेअर करत आहेत.

प्रत्येक घरात वडिलांचा एक दरारा असतो. त्यांच्या धाकात आपण लहानाचे मोठे होतो. त्यांना पाहून आपणही त्यांच्यासारखं व्हावं, असं प्रत्येक मुलाला वाटत असतं. पण हेच वडील तुमच्या कामाच्या ठिकाणी बॉस असतील तर? होय. तेव्हा आपली काय अवस्था होईल याचे हुबेहूब एक्सप्रेशन्स या व्हिडीओमधील मुलाने टिपले आहेत. या व्हायरल व्हिडीओमधल्या लेकानं अगदी वडिलांसारखं पायलट होऊन त्यांच्यासोबत बसून काम करत आहे. त्याचे वडीलच त्याचे बॉस आहेत. जेव्हा हे दोघे बाप-लेकाची जोडी कॉकपिटमध्ये बसलेले असताना हा क्षण मुलाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. या व्हिडीओमध्ये बॉस असलेले त्याचे वडील अगदी गांभिर्याने आपलं काम करत होते. जसंच मुलाने आपल्याकडे केलेला कॅमेऱ्याकडे त्यांनी पाहिलं तसंच त्यांच्या हसू आवरले नाही. बॉस असलेले वडील हसल्यानंतर मुलगा सुद्धा हसू लागला.

आणखी वाचा : विदेशी तरूणाने चक्क स्केटिंग करत वेगात धावणारी बस पकडली, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : डोळ्यात अश्रू… हातात दिवंगत वडिलांचा फोटो घेऊन नवरी मंडपात आली, पाहा भावूक VIRAL VIDEO

मुलगा एरिक लेक याने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. “जेव्हा तुमचे वडील दिवसभर कामावर तुमचे बॉस बनतात” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. पायलट बाप-लेकाच्या जोडीचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून तो लोकांना फार आवडू लागलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १६ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १.३ मिलियन इतक्या लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Story img Loader