Viral Video : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात सर्वकाही बदलले. माणसाच्या गरजा सुद्धा बदलल्या आहेत. माणसाचे काम करायला रोबोट आले आहे. सध्या असाच एका रोबोटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क रोबो डॉग दिसत आहे. हा रोबो डॉग कुत्र्याप्रमाणेच चार पायावर चालणारा आहे. तुम्ही कधी विचार केला का? जेव्हा रोबो डॉग आणि कुत्र्याचा आमना सामना होईल तेव्हा काय घडू शकते? जर नाही तर हा व्हिडीओ नक्की पाहा. या व्हिडीओमध्ये कुत्रा आणि रोबो डॉग एकमेकांसमोर दिसत आहे. रोबो डॉगला पाहून कुत्रा पुढे काय करतो, हे एकदा पाहाच.
कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा प्राणी आहे. अनेक जण आवडीने कु्त्रा पाळतात. सोशल मीडियावर अनेक जण कुत्र्याचे व्हिडीओ शेअर करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा कुत्रा आणि रोबो डॉगचा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. आयआयटी कानपूर येथील हा व्हिडीओ आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मैदानावर रोबो डॉग चालताना दिसतो. त्याला पाहून एक कुत्रा धावत त्याच्याकडे येतो आणि रोबो डॉगला एकटक बघत असतो. दोघेही एकमेकांकडे बघत गोल गोल फिरत असतात अचानक रोबो डॉग खाली पडतो आणि व्हिडीओ संपतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. रोबो डॉगच्या आजुबाजूला अन्य कुत्रे सुद्धा होती पण ते दूरुन सर्व बघत होती. या व्हिडीओवर लिहिलेय, “आयआयटी कानपूर”
हेही वाचा : Video : बापरे! रेल्वेच्या एसी डब्यात फिरत होता चक्क उंदीर, महिलेने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
dr.mukesh.bangar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मजेशीर व्हिडीओ रोबो डॉग विरुद्ध खरा कुत्रा” या व्हिडीओवर 15 हजारहून अधिक लाइक्स आल्या असून चार लाखाहून अधिक लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे.
अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान” तर आता कुत्र्यांमध्येही बेरोजगारी वाढेल.” आणखी एका युजरने लिहिलेय, “या रोबो डॉगचा उपयोग काय आहे?” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.