Viral Video : ‘डॉली चहावाला’ सध्या कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत येत असतो. डॉली चहावाला मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना चहा पाजल्यानंतर लोकप्रिय झाला होता. त्याच्या चहा बनवण्याची स्टाइल अनेकांना आवडली त्यानंतर अनेक जणांनी त्याच्या चहाच्या टपरीवर भेट दिली. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक रशियन इन्फ्ल्युएन्सर डॉली चहावाल्याच्या टपरीवर पोहचली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या इन्फ्ल्युएन्सरचे नाव मॅरी आहे जी रशियन आहे पण भारतात राहते आणि सोशल मीडियावर भारतातील अनेक व्हिडीओ शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिला जवळपास २६ लाख लोकं फॉलो करतात. ती जेव्हा डॉली चहावाल्याच्या टपरीवर पोहचते तेव्हा काय घडते, एकदा पाहाच.
व्हायरल व्हिडीओ
डॉली चहावाला आणि मॅरीने या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मॅरी टपरीवर जाते आणि बिल गेट्सच्या स्टाइलमध्ये म्हणते, “वन चाय प्लीज” त्यानंतर तुम्हाला दिसेल की डॉली त्याच्या हटके स्टाइलमध्ये चहा बनवताना दिसतो. त्यानंतर मॅरी डॉलीबरोबर पोझ देत फोटो काढताना दिसते. डॉली तिला त्याच्या स्टाइलमध्ये पोझ द्यायला शिकवतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
mariechug या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मॅरीने तर dolly_ki_tapri_nagpur या इन्स्टाग्राम अकाउंटवरून डॉलीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “चहाची टपरी लावून सुद्धा करिअर करू शकता.” तर एका युजरने लिहिलेय, “याल म्हणतात यश” आणखी एका युजरने लिहिलेय, “डॉली मला सुद्धा लोकप्रिय कर”
काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर इंटरनेटवर प्रसिद्ध असलेल्या या चहा विक्रेत्याबरोबर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये डॉली चहावाल्याने त्याच्या खास शैलीमध्ये बनवलेल्या चहाचा आस्वाद बिल गेट्स दिसले होते. त्यानंतर रातोरात डॉली खूप लोकप्रिय झाला होता.