Viral Video : सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर आणि थक्क करणारे असतात की आपण कल्पनाही करू शकत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लहानग्याचा सुपरहिरो स्पायडर मॅन चक्क शेतात काम करताना दिसत आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पायडर मॅन हे मार्व्हेल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या चित्रकथांमधील एक काल्पनिक व्यक्तिमत्त्व आहे. या व्यक्तिमत्वावर आधारीत चित्रपट सुद्धा आला आहे. लहान मुलांना आवडणाऱ्या स्पायडरमॅन या व्यक्तिमत्त्वाने जगात खूप लोकप्रियता मिळवली.सोशल मीडियावर स्पायडरमॅनचे अनेक चाहते दिसून येतात. काही लोक स्पाडरमॅनवर मीम्स, व्हिडीओ बनवत असतात. असाच हा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये स्पायडरमॅनसारखा पोशाख परिधान करुन एक तरुण गावाकडे वावरताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही वाटेल की जणू काही स्पायडमॅन स्वत:गावाकडे गेला असून शेतातील कामं करतोय.

या व्हायरल गावातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला गावातल्या शेतात शेतकरी महिलांबरोबर स्पायडरमॅन उस तोडताना दिसत आहे. त्यानंतर स्पायडरमॅन डोक्यावर मोळी उचलून नेताना दिसत आहे. व्हिडीओत पुढे स्पायडरमॅन गावात ट्रॅक्टर चालवताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. स्पाडरमॅनचे चाहते तर हा व्हिडीओ पाहून भारावून जाईल. काही लोकांना क्षणभरासाठी खरंच वाटेल की हा खरा स्पायडरमॅन आहे पण हा व्हिडीओ क्रिएटिव्हीटीचा वापर करून तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा : “यहा कदम कदम पर लाखो समस्या है…” तरुणीने गायलं भन्नाट गाणं; मध्यमवर्गीय लोकांच्या सांगितल्या समस्या, VIDEO व्हायरल

premvedi_por या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्पायडरमॅन गावाकडे आल्यावर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “स्पायडरमॅन – गावाकडचा शेतकरी” तर एका युजरने लिहिलेय, “पोटासाठी करावं लागतं” आणखी एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “स्पायडरमॅन गावाकडे सुट्टीवर आल्यावर…” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ पाहून कमेंट्समध्ये हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When spider man come to village a spider man superhero of children doing farm work video goes viral on social media ndj
Show comments