Viral Video : शाळा हा प्रत्येकाच्या आवडीचा एक भाग आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेला खूप महत्त्व आहे. शाळेतील आठवणी, वर्गमित्र, शिक्षक कायम स्मरणात राहतात. सोशल मीडियावर शाळेतील व्हिडीओ व्हायरल होत असतात अनेकदा हे व्हिडीओ पाहिल्यानंतर शाळेचे दिवस आठवतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ भावुक करणारे असतात. हे व्हिडीओ पाहून अनेकदा पोट धरून हसायला येते तर काही वेळा हे व्हिडीओ पाहून जुन्या आठवणीत मन रमतं.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षक विद्यार्थ्यांना गृहपाठाविषयी विचारताना दिसत आहे. त्यावर ती विद्यार्थी मजेशीर उत्तर देतात. हे उत्तर ऐकून तुम्हालाही तुमचे शाळेचे दिवस आठवतील.
हा व्हायरल व्हिडीओ एका शाळेतील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला तीन विद्यार्थी दिसतील जे शिक्षकांसमोर उभे आहेत. शिक्षक त्यांना गृहपाठाविषयी विचारत आहे. शिक्षक सांगतात, या तीन विद्यार्थ्यांनी गृहपाठ केला नाही. ते सुरुवातीला पहिल्या विद्यार्थ्याला विचारता, “गृहपाठ का केला नाही?” त्यावर विद्यार्थी म्हणतो, “नोटबूक नाही” शिक्षक दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारतो, “गृहपाठ केला पण वही घरी राहीली. बॅगेत होती पण बहिणीने वही बाहेर काढली” तिसरी विद्यार्थीनी म्हणते, “पोटात दुखत होते, म्हणून गृहपाठ केला नाही.” हा व्हिडीओ पाहून अनेकांना पोट धरून हसायला येईल काही लोकाना त्यांचे शाळेतील दिवस आठवतील. तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे यापैकी एक तरी कारण शाळेत असताना शिक्षकांना सांगितले असेल.
हेही वाचा : स्मशानभूमीतील थरकाप उडवणारा VIDEO, जळत्या चितेवर तरुणानं केलं असं काही की…; पाहून तुम्हालाही भरेल धडकी
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
marathi_memer_2.0 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे बघून जुने दिवस आठवले राव” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वर्ष बदलत जातात पण कारण तेच राहतात” तर एका युजरने लिहिलेय, “२५ वर्षांपूर्वी आम्ही पण हेच कारण सांगायचो” तर एका युजरने लिहिलेय, “लिहीलंय पण वही घरी राहीली” आणखी एका युजरने लिहिलेय, “आमच्या आधी १०० वर्ष आणि आमच्या पुढं १०० वर्ष हीच कारणं असणार” एक युजर लिहितो, “सर गृहपाठ लिहिला पण वही घरी विसरून आलो” तर एक युजर लिहितो, “लहान पण देगा देवा..शाळचे दिवस” अनेक युजर्सना त्यांच्या शाळेचे दिवस आठवले.