Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून आपण भावूक होतो तर काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते. तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अनेक लोकांचे व्हिडीओ पाहिले असेल.
ट्रॅफीक हा असा विषय आहे जो प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकांना दररोज ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावर सुद्धा ट्रॅफिकमधील अनेक गमती जमतीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी भांडताना दिसतात तर कधी कोणी गाणी गाताना दिसतात. कधी कोणी यावेळेचा सदुपयोग करण्यासाठी भाजी मोडताना दिसतात तर कधी कोणी मजेशीर कृती करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की ट्रॅफिकमध्ये अडकलेला एक तरुण ट्रॅफिक कधी सुटणार, हे पाहण्यासाठी वैतागून चक्क त्याच्या स्कुटीवर उभा राहतो. तरुणाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. (when this traffic ends a young man stand on scooty video goes viral)
ट्रॅफिक पाहून वैतागलेला तरुण चक्क स्कुटीवर उभा राहिला (a young man stand on scooty by seeing heavy traffic)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला रस्त्यावरील ट्रॅफिक दिसेल. व्हिडीओमध्ये तुम्हाला रस्त्यावर अडकलेले अनेक वाहने दिसतील पण एका स्कुटी चालक तरुणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हा तरुण पुढे किती ट्रॅफिक आहे आणि ट्रॅफिक कधी सुटणार हे बघण्यासाठी चक्क स्कुटीवर उभा आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओवर लिहिलेय, “हा तरुण म्हणत असेल ट्रॅफिक कधी सुटणार. मला माझ्या आवडत्या व्यक्तीला भेटायला जायचे आहे.”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
_kachhua_hu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला माहीत आहे, हे बंगळुरू येथील ट्रॅफिक आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हा तरुण नागपूरचा आहे वाटते” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.