Funny Viral Video : पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी दिसून येते. दोन व्यक्ती लग्न करून नव्या आयुष्याची सुरूवात करतात आणि आयुष्यभर एकमेकांबरोबर राहण्याचे वचन देतात. लग्नाच्या सुरुवातीला ते एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करतात, मनातील भावना व्यक्त करतात पण मुले मोठी झाली आणि संसार जसा जसा वाढत जातो, तसे ते प्रेम व्यक्त करत नाही. एकमेकांविषयी मनात असलेल्या भावना व्यक्त करत नाही.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अचानक एक दिवस जेव्हा काका काकूला आय लव्ह यू म्हणतात. तेव्हा नेमकं काय घडतं? हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
kaka dance on marathi song bai g pichali Majhi bangadi goes viral on social media
“बाई गं पिचली माझी बांगडी बांगडी” मराठमोळ्या गाण्यावर काकांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल

हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. कार्यक्रमातील अँकर एका काकाला समोर बोलावतो आणि त्यांच्या घरी फोन लावतो आणि काकूला ‘आय लव्ह यू’ म्हणायला सांगतो. काका जेव्हा काकूला ‘आय लव्ह यू’ म्हणतात, तेव्हा काकूंची काय प्रतिक्रिया असते, हे आज आपण जाणून घेऊ या.

हेही वाचा : Pune : “जग फिरून या पण पुण्यासारखं शहर नाही…” Viral Video एकदा पाहाच

काका – हॅलो
काकू – अं काय ओ..?
काका – काय करायलीस?
काकू – कोण?
काका – तू
काकू – काय करू?
काका – आय लव्ह यू
काकू – काय?
काका – आय लव्ह यू
काकू – कसं काय? कशामुळं!
काका – उगं! आय लव्ह यू
काकू – येडं बीड झालाव का?
काका – खूप प्रेम आहे ग तुझ्यावर
काकू – अं… हो का?
काका – खरंच
काकू – हो का? बरं..
काका – आय लव्ह यू
काकू – हॅलो
काका – उत्तर दे की तू पण म्हण आय लव्ह यू
काकू – कुठं हाव तुम्ही
काका – कार्यक्रमात
काकू – काय येड्यासारखं ओ
काका – आय लव्ह यू
काकू – अईईईई..ठेवा हर उगं फोन
काका – अगं आय लव्ह यू ग
काकू – ठेवा फोन.

काका काकूंचा हा संवाद ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांच्या पती किंवा पत्नीची आठवण येईल तर काही लोकांना त्यांचे जुने दिवस आठवतील. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

sushilsuryawanshi05 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अचानक केला बायकोला कॉल..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बायकोला जर विषय बदलायचा असेल तर लगेच म्हणतात कुठे आहात? कसे गेलात?” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान आहे व्हिडिओ” आणखी एका युजरने लिहिलेय, “काका नाही आवरत i love u too म्हणाल्याशिवाय” आणखी एका युजरने लिहिलेय, “साधी भोळी माणसं”

Story img Loader