Viral Video : जीवन आणि मृत्यू हे जीवनातील कटू सत्य आहे. प्रत्येकाला एक दिवस मृत्यूला सामोरे जावे लागते पण कोणालाच माहिती नसते की आपला मृत्यू कधी होणार पण तुम्ही कधी विचार केला का की जेव्हा आपल्याला कळेल की आपला मृत्यू लवकरच होणार आहे, त्यावेळेस आपल्या मनात काय सुरू असणार?
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोंबडीला तिचा मृत्यू तिच्या समोर दिसत आहे. घाबरलेली ही कोंबडी चिकनच्या तुकड्यांकडे एकटक बघताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
चिकनच्या तुकड्यांकडे टक लावून बघतेय कोंबडी
हा व्हायरल व्हिडीओ एका चिकन विक्रेत्याच्या दुकानातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला एक कोंबडी दिसेल जी एक टक पाहताना दिसत आहे. तिच्या पिंजऱ्याच्या शेजारी विक्रेता चिकनचे तुकडे करताना दिसत आहे. कोंबडीचे संपूर्ण लक्ष त्या चिकनच्या तुकड्यांकडे आहे. तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे. तिचा चेहरा पाहून तुम्हालाही दया येईल. तिला तिचा मृत्यू तिच्यासमोर दिसत आहे पण ती काहीही करू शकत नाही. या व्हिडीओवर लिहिलेय, “जगातील सर्वात वाईट क्षण आपल्या मृत्यूची वाट पाहणे” हा व्हिडीओ पाहून काही लोक कदाचित नॉनव्हेज खाणे सुद्धा सोडतील.
पाहा व्हायरल व्हिडीओ
vegun_rover या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वीगन बना” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” जगातील सर्वात वाईट क्षण, आपल्या माणसांना कापताना पाहणे” तर एका युजरने लिहिलेय, “मी वचन देतो की यापुढे खाणार नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी आजवर खाल्ले नाही आणि यापुढेही खाणार नाही” एक युजर लिहितो, “देवा असं काही तरी कर की कोणी कोणाचे मास खाणार नाही” हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी लिहिलेय की ते यानंतर नॉनव्हेज खाणार नाही. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी दु:ख व्यक्त केले आहेत.