Viral Video : नवरा बायकोचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसते. लग्नानंतर पती पत्नी जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या नादात एकमेकांना वेळ देत नाही, प्रेम व्यक्त करत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जेव्हा पत्नी पतीला अचानक फोनवर ‘आय लव्ह यू’ म्हणते, तेव्हा नेमकं काय घडते? हे तुम्हाला या व्हिडीओमधून दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की अँकरच्या सांगण्यावरून महिला नवऱ्याला फोन लावते. नवरा बायकोमधील हे संभाषण ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल.

हेही वाचा : “बाळांनो आयुष्य म्हणजे खेळ नाही रे” सेल्फी घेण्यासाठी ट्रॅकच्या बाजूला उभा राहिला, पण मागून मृत्यू धावत आला; थरारक VIDEO

u

पत्नी – हॅलो
पती – हा..
पत्नी – कुठे आहे?
पती – घरी आहे काय झालं?
पत्नी – आय लव्ह यू
पती – काय?
पत्नी – आय लव्ह यू
पती – का बाळा अचानक?
पत्नी – आय लव्ह यू
पती – काय झालं काय तुला?
पत्नी – हॅलो
पती – दारू बिरू प्यायली का? पागल हाय? हॅलो काय फंडा आहे हा?
पत्नी – खूप मिस करते आय लव्ह यू
पती – केकेमध्ये काही टाकले होते का? बोलना?
पत्नी – आय लव्ह यू
पती – तू पागल हाय काय? पागल आहे? काय फंडा आहे. सेम टू यू.. जाऊ दे
पत्नी – आय लव्ह यू
पती – सेम टू यू बोललो मग आता किती वेळा बोलतीस?

हे संभाषण ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल. या व्हिडीओमध्ये अँकर सुद्धा हसताना दिसत आहे. सध्या हा व्हिडाओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : China’s Richest Zhang Yiming’s Wealth : चीनच्या सर्वांत श्रीमंत व्यक्तीची संपत्ती माहितेय का? मुकेश अबांनींच्या तुलेनत…

sushilsuryawanshi05 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अचानक केला नवऱ्याला कॉल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा गेम खूप भारी आहे मला खूप आवडतो” तर एका युजरने लिहिलेय, “पहिला माणूस भेटला जो आय लव्ह यूचं उत्तर सेम टू यू मध्ये देतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही मराठी संस्कृती आहे आणि मराठी नवरा आहे” एक युजर लिहितो, “खूप हसलो राव” तर एका युजरने लिहिलेय, “नवरे असेच असतात” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.