Viral Video : साडी ही भारतीय संस्कृतीची एक ओळख आहे. भारतीय स्त्री साडमध्ये खूप सुंदर दिसते, असे अनेकदा म्हटले जाते. हा एक भारतीय स्त्रियांचा पारंपारिक, वैशिष्ट्यपूर्ण वस्त्राचा प्रकार आहे. जरी हा पारंपारिक वस्त्र प्रकार असला तरी अनेक मॉडर्न अवतारात सु्द्धा नवनवीन साड्या उपलब्ध आहे. हल्ली तरुणी, स्त्रिया नवनवीन हटके प्रकारच्या साड्या नेसतात.सोशल मीडियावर तुम्ही साडीमध्ये फोटो काढून मिरवणाऱ्या स्त्रियांचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणी रस्त्यावर लाल साडी नेसून फिरत आहे पण हा रस्ता भारतातील नसून चीनमधील आहे. होय, एक भारतीय तरुणी सुंदर लाल साडीमध्ये चीनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तिला या वेशभूषेत बघून चिनी लोकं थक्क झालेले कॅमेरात कैद झाले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी दिसेल. तिने सुंदर लाल साडी नेसली आहे. मॉडर्न लूकमध्ये ती खूप गोड दिसत आहे.व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ती रस्त्यावर फिरताना दिसते. तेव्हा सर्व चीनी लोकं तिच्याकडे बघताना दिसतात. तिचा लूक पाहून सर्व जण अवाक् होतात. रस्त्यावरून येणारे जाणारे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण तिच्याकडे बघताना दिसतात. ती लाल साडीमध्ये खूप आकर्षक दिसत असल्याने कोणाचीही नजर तिच्यावरून हटत नाही. काही लोकं तिचा फोटो किंवा व्हिडीओ काढताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : काय सांगता! येथे चक्क दारुने केली जाते अंघोळ, VIDEO होतोय व्हायरल

भारतात साडी नेसणे, खूप सामान्य गोष्ट आहे पण जेव्हा तुम्ही चीनमध्ये साडी नेसता, तेव्हा लोकांची प्रतिक्रिया तुम्हाला या व्हिडीओत दिसू शकते. weronika.fox या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने हा व्हिडीओ शेअर केला असून चीनमध्ये साडी नेसल्यानंतरचा तिचा अनुभव सांगितला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आपण फक्त भारतातच साडी का नेसतो?”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आत्मविश्वासू भारतीय मॉडर्न स्त्री” तर एका युजरने लिहिलेय, “मी दररोज पॅरीसमध्ये साडी नेसते” आणखी एका युजरने लिहिलेय, “भारत हा सगळीकडे असतो” एक युजर लिहितो, “तुम्ही साडीमध्ये खूप सुंदर दिसत आाहात.”

Story img Loader