Viral Video : साडी ही भारतीय संस्कृतीची एक ओळख आहे. भारतीय स्त्री साडमध्ये खूप सुंदर दिसते, असे अनेकदा म्हटले जाते. हा एक भारतीय स्त्रियांचा पारंपारिक, वैशिष्ट्यपूर्ण वस्त्राचा प्रकार आहे. जरी हा पारंपारिक वस्त्र प्रकार असला तरी अनेक मॉडर्न अवतारात सु्द्धा नवनवीन साड्या उपलब्ध आहे. हल्ली तरुणी, स्त्रिया नवनवीन हटके प्रकारच्या साड्या नेसतात.सोशल मीडियावर तुम्ही साडीमध्ये फोटो काढून मिरवणाऱ्या स्त्रियांचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणी रस्त्यावर लाल साडी नेसून फिरत आहे पण हा रस्ता भारतातील नसून चीनमधील आहे. होय, एक भारतीय तरुणी सुंदर लाल साडीमध्ये चीनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तिला या वेशभूषेत बघून चिनी लोकं थक्क झालेले कॅमेरात कैद झाले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा