Pune Viral Video : पुण्यात वाहनं चालवणं म्हणजे फार कसरतीचे काम मानले जाते. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे पुण्यात अनेक ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे पुणे आणि ट्रॅफिक आता एक समीकरण बनलं आहे. अशाने पुणे शहरातील वाहतुकीची शिस्त दिवसेंदिवस बिघडताना दिसतेय. अनेकदा पुण्यात फिरायचं म्हणजे लोकांना मोठा प्रश्न पडतो की, फिरण्यासाठी मोकळा रस्ता नेमका कुठला असेल? कारण- इथे बाईकचालक तर नियम धाब्यावर बसवूनच वाहन चालवतात; पण अनेक मोठी वाहनेदेखील नियम पाळताना दिसत नाहीत. अशाने अनेकदा अपघाताच्या घटना घडतात; पण यातूनही पुणेकर मात्र काही धडा घेताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर पुण्यातील हडपसरमधील एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका जोडप्याने वाहतूक नियमांची अक्षरश: मर्यादा ओलांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकही चूक बेतू शकली असती जीवावर

हायवेवर जोडपं ज्या पद्धतीने बाईक चालवतंय ते पाहता, यांना जीव महत्त्वाचा नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण- हे जोडपं बाईक चालवताना वापरत असलेली पद्धत आणि मार्गिका अतिशय चुकीची असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहतानाही भीतीदायक वाटतोय. कारण- चुकूनही एखाद्या वाहनाची धडक बसली असती, तर भीषण अपघाताची घटना घडू शकते.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक जोडपं महामार्गावरून भरधाव बाईकनं जात आहे; पण बाईक सरळ उलट्या मार्गानं वेगानं पळवत नेली जात आहे, महामार्ग असल्यानं समोरूनही वेगाने वाहनं येत आहेत, मात्र जीवाची पर्वा न करता ते जोडपं या सर्व वाहनांतून रस्ता काढून वेगाने उलट दिशेनं पुढे जातायत. यावेळी एकही चूक जीवावर बेतू शकली असती; मात्र त्याची पर्वा न करता बाईकस्वार आरामात जाताना दिसतोय. धक्कादायक बाब म्हणजे बाजूने एक आरटीओची कारदेखील पास होते; मात्र त्यांचेही या प्रकाराकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पुणे पोलीस आहात कुठे, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

पुणेकरांनो, नववर्षाचा संकल्प असावा तर असा! तरुणानं ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता केलं असं काही की…; VIDEO पाहून हसाल पोट धरून

व्हिडीओ पाहून लोकांनी पुणे वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

पुण्यातील हडपसर रस्त्यावरील हा व्हिडीओ @chal_pune नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, हडपसर येथील पुलावरून एक दुचाकीस्वार बिनधास्तपणे विरुद्ध लेनमधून गाडी चालवत होता. समोरून RTO ची गाडीसुद्धा येताना दिसते, परंतु त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केले. कदाचित याच कारणामुळे पुण्यात ट्रॅफिकचे नियम कोण पाळत नसावं…! दरम्यान, अनेक युजर्सदेखील या प्रकारावरून पुणे पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. तसेच काही जण भन्नाट कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, साडीच्या दुकानात साडी चेंज करायला जायचं असेल. दुसऱ्याने लिहिले की, बायको म्हणाली असेल की, इकडून गाडी घ्या. घ्या तर घ्या. तिसऱ्याने लिहिले की, पुणे पोलीस कुठे आहेत यासह अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where are the pune police couple breaks traffic rules and rides bike opposite direction on busy road people angry after seeing video sjr