भारतीयांना सोन्याविषयी असणारं आकर्षण ही काही नवी बाब नाही. विविध कारणांसाठी आणि विविध निमित्ताने भारतीय नागरिक सोन्याचे दागिने विकत घेत असतात. काही लोक सोन्याची खरेदी वैयक्तिक वापरासाठी म्हणजे दागिन्यांच्या रूपात करतात. काही जण सोन्याची खरेदी गुंतवणुकीसाठी करतात. वेळप्रसंगी उद्योग-धंद्यात चटकन कर्ज मिळावं किंवा भांडवल उभारता यावे म्हणूनदेखील काही जण सोनं विकत घेतात. आतापर्यं तुम्ही तुमचे दागिने कपाटात, पेटीमध्ये लॉकरमध्ये ठेवले असतील, किंवा इतर लोकही हेच करतात हे एकल असेलच.
घरात चोरी आणि दरोड्याच्या भीतीने लोक बॅंकांच्या लॉकरमध्ये पैसा अडका दागिने ठेवणे सुरक्षित मानत असतात. घराच्या तुलनेत बॅंकचे लॉकर सुरक्षित मानले जात असतात. त्यामुळे जास्त रक्कम असेल, दागिने वा महत्वाची कागद पत्रे ग्राहक बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यास प्राधान्य देत असतात. बॅंकेचे लॉकर ग्राहकांना सुरक्षित वाटत असते. मात्र अजूनही अशी लोकं आहेत जी घरातच दागिने ठेवतात. मात्र तुम्हाला माहितीये का पूर्वी जेव्हा घरात लॉकर नव्हता तेव्हा कुठे ठेवलं जायचं सोनं? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये पाहायला मिळतंय की, पूर्वी लोक सोनं कुठे ठेवायचे?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती एका प्रचंड मोठ्या खडकाखालचा एक तुकडा दरवाजासारखा बाहेर ओढताना दिसत आहे. त्याखालील जागेत गुप्तधन साठवलं जात असे. दरवाज्यावर दगड लावण्यात आले आहेत त्यामुळे तिथे कुणी तरी संपत्ती लपवून ठेवत असेल अशी शंकाही येणार नाही. हा व्हिडिओ कुठला आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> अतिउत्साह नडला! खवळलेल्या समुद्रात लाट आली अन् महिलेला क्षणात घेऊन गेली, घटनेचा VIDEO VIRAL
ज्यांच्याकडे खूप धन असायचं असे लोक घरात गुप्त तळघरं निर्माण करुन तिथे आपली संपत्ती लपवून ती सुरक्षित ठेवत असत. त्यामुळे कोणी चोर दरोडेखोर आलेच तर त्यांच्या नजरेस काही पडू नये याची खबरदारी म्हणून ही व्यवस्था केली जात असे.