सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. या व्हिडीओमध्ये एका निष्पाप चिमुकल्याने त्याला विचारलेल्या प्रश्नाची अशी उत्तरे दिली आहे की हे पाहून तुम्हाला तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. हा चिमुकला नेमका काय म्हणाला, हे आज आपण जाणून घेऊ या. (where were you at your parents wedding a little innocent child amazing answer will shock you video viral)

“मम्मी पप्पांच्या लग्नात तु कुठे होता?”

हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एका स्टेजवर लहान मुले जमलेले दिसेल आणि त्यांच्याबरोबर एक अँकर सुद्धा आहे जो त्या चिमुकल्यांना प्रश्न विचारत आहे. या स्टेजसमोर हजारोच्या संख्येने प्रेक्षक बसलेले आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक अँकर एका चिमुकल्याला प्रश्ने विचारतो त्यावर चिमुकला त्याला भन्नाट उत्तरे देतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : ‘जेव्हा लहान मुलांकडे मोबाइल नसायचा…’ चिमुकल्यांचा खोडकरपणा पाहून आठवतील तुमच्या बालपणीचे दिवस; पाहा VIDEO

अँकर – तुझं लग्न झाल आहे का?
चिमुकला – नाही
अँकर – मम्मी पप्पांच
चिमुकला – हो
अँकर – तु होता का लग्नाला
चिमुकला – नव्हतो
अँकर – कुठे गेला होता
चिमुकला -पोटात
अँकर – घरी कोण कोण असतं?
चिमुकला – आई, पप्पा, आज्जी, आबा आणि बापू
अँकर – तुझी बायको कुठे असते?
चिमुकला – शाळेत

चिमुकल्याचे उत्तरे ऐकून प्रेक्षक पोट धरून हसताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : एक हजार रुपयांच्या क्रिकेट बॅटची लालबागचा राजाच्या दरबारी लागली बोली; VIDEO मधील फायनल बोलीची किंमत ऐकून व्हाल अवाक्

actor_om_yadav_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुले म्हणजे देवाघरची फुले” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आताची लहान मुले म्हणजे निळू फुले ” तर एका युजरने लिहिलेय, “अगदी बरोबर उत्तर दिली बाबूने ” आणखी एका युजरने लिहिलेय, “हुशार आहे कारट….” एक युजर लिहितो, “काय कारटं आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.