आयुष्यात संघर्ष कोणाला चुकला आहे. प्रत्येकाला आयुष्यात संघर्ष करते. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो मग कोणीही असो. आयुष्य हे संघर्षाचे दुसरे नाव आहे. आयुष्यात कधी चांगले दिवस असतात तर कधी वाईट दिवस असतात. अनेकदा लोकांच्या वाटेत अनेक संकटे आणि अडचणी येतात पण जो हार न मानता त्याचा सामना करतो तेच लोक आयुष्यात यशस्वी होतात. संघर्ष नको म्हणून हातावर हातात धरून बसले तर आयुष्यात काहीच मिळणार नाही. आयुष्य बदलायचे असेल, आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे असेल तर न थांबता, न थकता, लक्ष विचलित न होऊ देता सतत प्रयत्न करत राहिले तर एक दिवस विजय नक्की मिळतो. अशा एका संघर्षाचा सामना करणाऱ्या चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो सर्वांना संघर्षाचा सामना करण्यासाठी प्रेरणा देत आहे.
पाहा Viral Video
संघर्ष कोणाला चुकला?
सोशल मीडियावर लहान मुलींच्या धावण्याच्या शर्यतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विजयाचा क्षण कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये स्लो मोशनमध्ये प्ले होत आहे ज्यामध्ये प्रथम एक मुलगी धावताना दिसते आणि पुढच्या क्षणी एक दुसरी मुलगी धावताना अचानक खाली पडताना दिसत आहे. ही चिमुकली इतक्या जोरात धावत असते की पडल्यानंतर काही अंतर ही घसरत जाते. त्याच क्षणी धावणारी मुलगी सीमा रेषेच्या जवळ पोहचते. एकीकडे खाली पडलेल्या मुलीचा हात सीमा रेषेला लागतो आणि दुसरीकडे पुढच्या क्षणी धावणारी मुलगी सीमा रेषे पलीकडे पाय टेकवते. हा समाना इतका अटी-तटीचा होता की विजय कोणाचा झाला हे सांगणे अवघड आहे. जी मुलगी पडली तिने हार मानली नाही आणि तिने अखेर शर्यत पूर्ण केली तर दुसरीकडे धावणारी मुलगी देखील थांबली नाही आणि शर्यत पूर्ण केली. व्हिडीओमध्ये नक्की कोणाचा झाला हे दाखवले नसले तरी दोघींचा संघर्ष पाहून अनेकांना प्रेरणा मिळते आहे. व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो”
व्हिडीओवर कमेंट करत नागरिकांना चिमुकल्यांच्या जिद्दीचे कौतुक केले आहे. कोणी पडलेल्या मुलगी शर्यत जिंकली असे म्हटले तर कोणी धावणारी मुलगी जिंकली. व्हिडिओ पाहून हीच शिकवण मिळते की शर्यत धावण्याची असो किंवा आयुष्याची संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो.”