आपण जेव्हा एखादं चित्र किंवा फोटो पाहतो तेव्हा त्यावर आपली नजर खिळून राहते. फोटो किंवा चित्रात नेमकं काय आहे? याबाबत उत्सुकता असते. रंगसंगतीसोबत त्यामागच्या भावना शोधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. चित्रकलेत अनेक प्रकार आहेत. त्यापैकी ऑप्टिकल इल्युजन एक प्रकार आहे. या चित्रांमधून आपल्याला सहज उत्तर मिळणं कठीण होत. त्यामुळे अशी चित्र पाहताना आपण बांधलेला अंदाज आणि त्यामागे दडलेलं चित्र यात फरक जाणवतो. त्यामुळे अनेकदा ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो समजणं कठीण होतं. सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूजन असलेले असंख्य फोटो व्हायरल होत असतात. या फोटोमध्ये तुम्हाला पूर्णपणे अडकवून ठेवण्याची क्षमता आहे. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ऑप्टिकल इल्युजन फोटोमध्ये एक प्राणी आणि एक पक्षी लपलेले आहेत. मात्र, अनेकांना या फोटोत फक्त पक्षी दिसतोय. तुम्ही नीट पाहिलं तर या फोटोत एक प्राणी आणि एक पक्षी दिसतील. सध्या व्हायरल होणाऱ्या खूप साऱ्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये हा फोटो सर्वात कठीण आहे, असं म्हटलं जातंय. कारण या फोटोत ज्यांना प्राणी सापडतोय, त्यांना पक्षी सापडत नाही आणि ज्यांना पक्षी सापडतोय त्यांना प्राणी दिसत आही. हा फोटो पाहिल्यानंतर त्यातल्या एका फोटोवर नजर खिळत नाही. त्यामुळे या फोटोत नेमकं काय दडलंय, हे समजण्यास अनेकांना अडचणी येत आहेत.
त्यामुळे तुम्हाला या फोटोत सर्वात आधी प्राणी दिसला की पक्षी दिसला, हे कमेंट करून सांगायला विसरू नका. शिवाय तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत हा फोटो नक्की शेअर करा.