is India The Dirtiest Country In The World : जगातील सर्वात घाणेरडा देश कोणता आहे? जर तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला तर तुमचे उत्तर काय असेल? तुम्हाला कदाचित उत्तर माहित नसेल पण हा प्रश्न परदेशी व्यक्तींना विचारला तेव्हा जे उत्तर मिळाले ते ऐकून अनेक भारतीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आला आहे ज्यामुळे चर्चेला उधान आले आहे.

बहुतेक लोकांना हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सर्वांचे उत्तर ‘भारत’ असे होते असे एका व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवले आहे. पण या प्रश्नाचे बरोबर उत्तर काय आहे कोणालाचा माहित नाही. लोकांच्या मनातील भारताविषयीची प्रतिमा या व्हिडीओमुळे समोर आली आहे.

भारताविषयी काय विचार करतात परदेशी लोक

सुमन कैस नावाच्या एका युट्यूबरने X वर व्हिडिओ पोस्ट केला. “मला माहित नाही की इथे लोक इतके आत्मविश्वासू का आहेत…..तुम्हाला का?” व्हिडिओ कॅप्शन वाचा, जो व्हायरल झाला आहे आणि तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

येथे पाहा Viral video

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती फिरत फिरत लोकांना विचारत आहे की, जगातील सर्वात घाणेरडा देश कोणता आहे. त्याने योग्य उत्तर देणाऱ्याला २० डॉलर्स देण्याचे आश्वासनही दिले. बहुतेक प्रतिसादकर्त्यांनी कोणताही संकोच न करता भारत हा जगातील सर्वात घाणेरडा देश असल्याचे सांगितले, तर एका माणसाचे उत्तर खूपच वेगळे होते.

भारत जगातील सर्वात घाणेरडा देश आहे का?

स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी, आयक्यूएअरच्या ताज्या विश्लेषणानुसार, आफ्रिकेतील चाड हा जगातील सर्वात घाणेरडा देश आहे. ११ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, फक्त सात देशांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या पीएम २.५ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूक्ष्म विषारी कणांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले.

पीएम२.५ म्हणजे २.५ मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचे लहान कण जे फुफ्फुसात खोलवर जाऊ शकतात आणि रक्तप्रवाहात देखील प्रवेश करू शकतात.

अहवालात म्हटले आहे की, नवी दिल्ली ही जागतिक स्तरावर सर्वात प्रदूषित राजधानी होती, त्यानंतर चाडची राजधानी एन’जामेना आहे.

सर्वात प्रदूषित देशांमध्ये चाड, बांगलादेश, पाकिस्तान, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि भारत हे होते. पाचही देशांमध्ये पीएम२.५ चे प्रमाण परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा किमान १० पट जास्त होते. अहवालात असे आढळून आले की चाडमध्ये पीएम२.५ चे प्रमाण शिफारस केलेल्या पातळीपेक्षा १८ पट जास्त होते.

Story img Loader