Viral Video : निसर्गाने आपल्याला भरभरून दिले. निसर्गाचे अनेक रुप आपण रोज अनुभवतो. अनेकदा निसर्गाचे सौंदर्य पाहून आपण थक्क होतो. हिरवेगार झाडे, डोंगर, दरी, नदी, तलाव, समुद्र खूप नयनरम्य असतात. अशातच समुद्र तर अनेकांना आवडतो. समुद्रकिन्यावर जाऊन समुद्राकडे एक टक बघत राहण्याची मजा काही वेगळीच असते. समुद्र पाहायचा असेल तर महाराष्ट्रातील कोकणातील बघावा. कोकणातील समुद्राची कुठेच तोड नाही. कोकणात अनेक लोकप्रिय समुद्र किनारे आहेत. दरदिवशी हजारो पर्यटक कोकण फिरण्यासाठी जातात. समुद्रकिनाऱ्यांना भेट देतात पण तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा माहितीये का? सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महाराष्ट्रातील एक सुंदर समुद्र किनारा दाखवला आहे. आज आपण त्या समुद्र किनाऱ्याविषयीच जाणून घेणार आहोत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर समुद्र किनारा दिसेल. हा सुंदर समुद्र किनारा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. समुद्र किनाऱ्यावर अथांग निळा सागर, त्याच्या उसळणाऱ्या लाटा, पांढरा फेस असे विलोभनीय दृश्य दिसत आहे. मनमोहक हे दृश्य पाहून तुम्हालाही एकदा या ठिकाणी भेट द्यावीशी वाटेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा, आरे वारे रत्नागिरी”
आरे वारे हा समुद्र किनारा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. रत्नागिरीपासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या दोन सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा हा एक संयोजन आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
aryan_07_ab या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आरे वारे, रत्नागिरी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपला महाराष्ट्र आपला अभिमान” तर एका युजरने लिहिलेय, “कोकण वाचवा कोकणातल्या जमिनी परप्रांतीयांना विकू नका असे देखील सांगा” आणखी एका युजरने लिहिलेय, “आरे वारे म्हणजे … स्वर्ग” एक युजर लिहितो, “महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे” तर एक युजर लिहितो, “कोकणात मोजू शकत नाही एवढे एका पेक्षा एक किनारे आहेत.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.