भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या बाबतीत कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. अनेक मोठ-मोठ्या कलाकारांना लाजवेल इतके फॅन फॉलोइंग मोदींकडे आहे. त्यामुळे ते देखील आपल्या चाहत्यांना खुश करण्यासाठी नेहमीच सोशल मीडियाच्या साह्याने त्यांच्याशी संपर्क साधतात. परंतु ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा सेल्फी काढण्यासाठी ते कोणता स्मार्ट फोन वापरतात हे माहित आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेंद्र मोदी अॅपलचा iPhone 6 वापरतात. गेल्या वर्षी मोदी चीन आणि दुबईच्या दौऱ्यावर असताना त्यांना iPhone 6 वापरताना पाहिले गेले होते. याच फोनच्या मदतीने त्यांचे सेल्फी काढतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे मोदी iPhone 6 वापरतात असे म्हटले जाते.

आता पुढचा प्रश्न असा पडतो की त्यांच्या फोनमध्ये कोणत्या कंपनीचे सीम कार्ड असते.

काही दिवसांपूर्वी त्यांनी मोबाईलचा एक स्क्रिनशॉट शेअर केला होता. त्या स्क्रिनशॉटमध्ये वोडाफोनचे नेटवर्क दिसले होते. त्याच्याच आधारे, पंतप्रधान मोदी वो़डाफोन कंपनीचे सिमकार्ड वापरत असल्याचे म्हटले जाते. तसेच अमित शहा iPhone XS वापरताना अनेकदा दिसले आहेत. हा फोन वर्षभरापूर्वीच लॉन्च झाला होता.