सोशल मीडियावर या ना त्या कारणाने व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खळखळून हसायला भाग पाडतात. तर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. कधी कधी व्हिडीओ चित्रित करताना एखादी गोष्ट घडते आणि ती वाऱ्यासारखी पसरते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान कलाकार सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकतील. पण कधी-कधी चांगले काम करत असताना विचित्र घटना घडते. असंच काहीसं स्टेजवर नाचणाऱ्या मुलींसोबत घडलं आणि एकच धावपळ उडाली.
व्हायरल व्हिडिओ एका कार्यक्रमादरम्यान रेकॉर्ड करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला सभागृह प्रेक्षकांनी भरलेला दिसेल. मोठा स्टेजही तयार आहे. यावर काही मुली नाचायला येतात. गाणं सुरु होताच मुलींचा परफॉर्मन्स सुरू होतो. प्रेक्षकही नृत्याचा आनंद घेताना दिसत आहे. दरम्यान नाचत असताना स्टेज पूर्णपणे तुटतो आणि खाली पडतो. त्यामुळे नाचणाऱ्या मुलीही खाली पडतात. हे पाहून काही लोक त्यांना वाचवण्यासाठी धावतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ काही सेकंदांचा असला तरी वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. तसेच काही यूजर्स यावर मजेशीर कमेंटही करत आहेत.