Viral Video : आपल्या जीवनात शिक्षणाचं आणि शिक्षकांचं अनन्यसाधारण महत्व आहे. विद्यार्थ्यांचे पालक शिक्षकांवर विश्वास ठेवून त्यांच्या मुलांना शाळेत पाठवतात; जेणेकरून त्यांच्यावर चांगले संस्कार होतील आणि भावी आयुष्यात ते यशाचे शिखर गाठतील. विद्यार्थ्यांमधील कला, आवड आणि त्यांची क्षमता ओळखून शिक्षक नेहमीच मुलांना घडवत असतात. शिक्षक प्रेमळ मनाचा असला तर मुलांचे दडपण कमी होते. शिक्षणाचा आनंद लुटता येतो आणि वर्गातील वातावरणसुद्धा सकारात्मक राहते. तर आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. एका शाळेत मुलाचा अभ्यास घेताना शिक्षिका त्याला कागदी पंख्याने वारा घालताना दिसून आली.

व्हायरल व्हिडीओ एका गावाच्या शाळेतील आहे. जिथे वर्गात अनेक मुले बसलेली तुम्हाला दिसून येतील. तसेच शिक्षिका वर्गात एका मुलाचा अभ्यास घेत आहे. एक मुलगा शिक्षिकेसमोर उभा आहे. मुलगा पुस्तक टेबलवर ठेवून पुस्तकाचे वाचन करताना दिसून येत आहे आणि शिक्षिका मुलाला शिकवता शिकवता त्याला कागदी पंख्याने वारा घालतानासुद्धा दिसून येत आहे. मुलाने गणवेश परिधान न करता साधे कपडे घातले आहेत आणि वर्गावरून शाळा ग्रामीण भागातील आहे हे स्पष्ट होत आहे. या सर्व गोष्टी असूनही शिक्षिका आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. अभ्यास करणाऱ्या मुलाला शिक्षिका कशाप्रकारे प्रोत्साहन देत आहे एकदा व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघाच…

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
NSUI, urban naxalites, students rights, NSUI latest news,
हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी नक्षली ठरवण्याचा प्रयत्न – एनएसयूआय
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून

हेही वाचा… Viral Video: तरुणीला रुग्णालयातच चढला शाहरुख खानच्या गाण्याचा फिव्हर, बेडवरून उठली अन् भन्नाट नाचू लागली

व्हिडीओ नक्की बघा :

शिक्षिकेनं पार पाडली जबाबदारी :

शिक्षिकेने मुलाला टेबलाजवळ उभं केलं आहे आणि त्याचे पुस्तक टेबलावर ठेवून, त्याच्या जवळ बसून त्याचा अभ्यास घेताना दिसून येत आहे. अशातच शिक्षिका अभ्यास करणाऱ्या मुलाला कागदी पंख्याने हवासुद्धा घालत आहे. उष्णतेपासून आराम देण्यासाठी शिक्षिका कागदी पंख्याने हवा घालत मुलाचा अभ्यास घेताना दिसून आली आहे ; जे पाहून तुम्हीही काही क्षणासाठी भावुक व्हाल आणि शिक्षिकेचं प्रेम आणि आपुलकी पाहून कौतुक कराल. अनेकवेळा शिक्षक इतके कोमल मनाचे असतात, त्यांच्यात इतकी आपुलकी आणि प्रेम असतं की, ते विद्यार्थ्यांवर आपल्या मुलांसारखं प्रेम करू लागतात. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसलं असेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @tarksahitya यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करून तुमच्या हिंदी शिक्षकाचे नाव लिहा, असे कॅप्शन देण्यात आले आहे आणि कॅप्शन पाहून प्रत्येक जण आपल्या आवडत्या शिक्षकाचे नाव लिहिताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.

Story img Loader