सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजही असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की कशाप्रकडे एक इसम धावत येऊन एका कुत्र्याचा जीव वाचवतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. तसेच, या व्हायरल व्हिडीओवर अनेक कमेंट्स देखील येत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक कुत्रा रेल्वे रुळाच्या मध्यभागी बसला आहे, तेव्हाच त्या रुळावरून एक ट्रेन जात असते. जेव्हा या गोष्टीची कल्पना एका इसमाला येते, तेव्हा तो धावत जाऊन कुत्र्याला वाचवतो. जर त्या इसमाला एक सेकंद जरी उशीर झाला असता तर त्या कुत्र्याचा मृत्यू झाला असता. सोशल मीडियावर नेटकरी या व्हिडीओला पसंती देत आहेत. तसेच, व्हायरल झालेला हा व्हिडीओ ते इतरांनाही शेअर करत आहेत.
Viral Video : लहान मुलीने नकळत केली अशी एक गोष्ट, जी ‘या’ महिलेला आयुष्यभर राहील लक्षात
Viral Video : नदीच्या किनारी उभी राहून बनवत होती रील्स; पुढे जे झाले ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल
हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून HumanBeingBro या अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट्सही आल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे – ‘हा खूपच इंटरेस्टिंग व्हिडीओ आहे. या माणसाला सलाम.’