Stunt Viral Video : प्रत्येक जण आपले काहीतरी वेगळंपण दाखवण्याचा प्रयत्न करतात. विशेषत: बहुतेक पुरुषांना आपल्या बॉडीचं, ताकदीचं खूप कौतुक असतं. आपण किती ताकदवान आहोत हे दाखवण्यासाठी बॉडी बिल्डर तरुण वजनदार वस्तू उचलताना दिसतात. अशाप्रकारे एका तरुणाने ताकद दाखवण्यासाठी चक्क ट्रॅक्टर उचलण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर त्याच्याबरोबर असे काही घडले ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. तरुण दोन पायांनी जोर लावून ट्रॅक्टरचं टायर उचलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचवेळी त्याच्याबरोबर असे काही घडले की, त्याला आयुष्यभर ती गोष्ट लक्षात राहील. सोशल मीडियावर तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

परंतु संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर, त्या तरुणाने केलेली चूक तुम्ही कधीही करणार नाही. चला तर मग जाणून घेऊन तरुणाकडून नेमकी काय चुक झाली.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Funny video Drunk man doing dance at a haladi ceremony funny video viral social media
देशी दारु अशी चढली की…हळदीला भर मांडवात काकांनी काय केलं पाहा; कोकणतल्या हळदीचा Video पाहून पोट धरुन हसाल

Read More Trending News : तुम्ही रस्त्यावर लिंबू सरबत पिताय? मग हा किळसवाणा Video पाहाच, पुन्हा पिण्यापूर्वी विचार कराल १०० वेळा

…अन् तरुणाचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटले (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एका ठिकाणी ट्रॅक्टर उभा असल्याचे दिसत आहे. यावेळी ट्रॅक्टरच्या मागच्या मोठ्या टायरजवळ एक तरुण सीट टाकून त्यावर बसलेला आहे. हा तरुण टायरजवळ लेग प्रेसच्या एक्सरसाइजच्या पोझमध्ये बसतो आणि दोन पायांनी टायर हवेत उचलणार असतो. काही सेकंदाने त्याने नीट पोझ घेत पायांनी टायर हवेत उचलतो, पण पुढच्याच क्षण तरुणाचे पाय एकदम वाकडे होतात आणि पायांवर ट्रॅक्टरचे वजन पडते. ट्रॅक्टरचे खूप वजन असल्याने त्याचे दोन्ही पाय गुडघ्याजवळून तुटतात.या धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ deathp0sitive नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, त्यामुळे लेग प्रेस करताना पाय लॉक करू नयेत. दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, हा व्हिडीओ पाहून मला वेदना का होत आहे? तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, आता तो पुन्हा कधीही व्यवस्थित चालू शकणार नाही. चौथ्या यूजरने लिहिले आहे की, हे पाहून मी घाबरलो.

Story img Loader