अनेकदा आपल्याला नखांवर पांढरे डाग दिसले असतील. हे पांढरे डाग पाहिले की बालपणीचे काही किस्से तुम्हाला नक्कीच आठवतील. शनिवारी नखं कापली म्हणून हे पांढरे डाग नखांवर दिसत आहेत किंवा शनिवारी चणे खाल्ले म्हणून नखांवर पांढरे डाग आलेत अशा एक ना अनेक गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या असतील. अशी उत्तरे आज आठवली तर आपल्या भाबडेपणावर आपल्याला खळखळून हसू येईल. नखांवर हे पांढरे डाग दिसण्याचे खरे कारण म्हणजे कॅल्शिअमची कमतरता होय. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे जशी हाडं ठिसूळ होतात किंवा हात पाय दुखू लागतात तसेच नखांवरही पांढरे डाग येतात. पण याव्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत ज्यामुळे हे पांढरे डाग नखांवर दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

नखांना आधी कधी जखम झाली असेल तर काही दिवसांनी नखांवर त्याचे डाग दिसतात. अनेकदा तुमच्या कळत नकळत नखांना इजा पोहचत असते यामुळे नखांवरील काही पेशींना हानी पोहचते. त्यामुळे काही आठवड्यानंतर नखं जशी वाढतात तसे नखांवर हे पांढरे डाग दिसून येतात. पेडिक्यूअर, मेनिक्यूअर करताना देखील अशाप्रकारे नखांना इजा पोहचू शकते. त्यामुळे, हे पांढरे डाग दिसून येतात. तर काही वेळा अॅलर्जीमुळे देखील अशा प्रकारे डाग दिसून येऊन शकतात. नेलपेंटमुळे होणारी अॅलर्जी देखील नखांना नुकसान पोहचू शकते. नखं जस जशी वाढत जातात तसे हे डाग हळूहळू नखांच्या वाढीबरोबर पुढे सरकतात. तेव्हा नखांवरच्या पांढ-या डागांमागे शनीची साडेसाती नसून कॅल्शिअमची कमतरता, नखांना झालेली इजा आणि अॅलर्जी यांसारखी कारणे आहेत.

वाचा : उशाखाली लसूण ठेवल्यावर असाही फरक पडतो