अंकिता देशकर

COVID 19 Vaccine: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक लेख आणि त्याच्या लिंकसह एक पोस्ट शेअर होत असल्याचे आढळले. पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कबूल केले आहे की, कोविड १९ ची लस घेतलेल्या हजारो माता गंभीर हृदयविकार असलेल्या बाळांना जन्म देत आहेत. यामुळे अनेक गर्भवती महिलांमध्ये भीती दिसून येत आहे. या प्रकरणाच्या तपासात या दाव्यांचा सविस्तर खुलासा झाला आहे.

loksatta chatura Custody Of Infant To Breastfeeding Mother
स्तनपान करणार्‍या अपत्याचा ताबा आईकडेच!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Delhi Pregnant teen murder
Pregnant teen murder: गर्भवती प्रेयसीचा लग्नासाठी तगादा; प्रियकरानं करवा चौथचा उपवास ठेवायला सांगितला आणि नंतर खड्डा खणून…
Maternity Benefit Act 1961, maternity benefits, working women,
गर्भधारणा लाभ कायदा हा नोकरीतील कंत्राटापेक्षा वरचढच!
A 15 year old girl was saved by advanced treatment in Pune print news
मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचूनही ‘ती’ बचावली! पंधरा वर्षीय मुलीची कहाणी
Mushfiqul Fazal Ansarey
Mushfiqul Fazal Ansarey: बांगलादेशचे भारतविरोधी राजदूत मुश्फिकूल फजल अन्सारी कोण आहेत? मोहम्मद युनूस सरकारने का केली आहे त्यांची नियुक्ती?
Mcdonald,United States
Mcdonald : बर्गर खाल्ल्याने ४९ जणांना ई-कोलाईचा संसर्ग; एकाचा मृत्यू
Sassoon hospital
बालकांच्या आनुवंशिक आजारांचे आता वेळीच निदान! ससूनमध्ये गरीब रुग्णांसाठी स्वस्तात सुविधा सुरू

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Truth Seeker ने व्हायरल दावा त्यांच्या प्रोफाइल वर शेअर केला.

बाकी यूजर्स देखील याच दाव्यासह ही पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही ट्विटमध्ये नमूद केलेल्या लिंकद्वारे लेख तपासून आमची तपासणी सुरू केली. ही लिंक thepeoplesvoice.tv या वेबसाईटची होती.

WHO Admits That Fully Jabbed Moms Are Giving Birth to Babies With Severe Heart Defects

हा लेख ४ जुलै २०२३ रोजी प्रकाशित झाला होता.

तथापि, लेखात कुठेही कोविड-19 लसीकरणाचा उल्लेख नाही. लेखात नमूद केले आहे की, WHO ने युनायटेड किंगडममधील नवजात आणि अर्भकांमध्ये गंभीर मायोकार्डिटिस प्रकरणांमध्ये असामान्य वाढ होत असल्याचा तपास सुरु केला आहे. त्यानंतर आम्ही गूगल क्रोम एक्सटेंशन StopagandaPlus वर ह्या वेबसाईट बद्दल माहिती शोधली, हे एक्सटेंशन वेबसाइटची अचूकता दर्शवते .

वेबसाइटची विश्वासार्हता रेटिंगही ‘कमी’ होती. वेबसाइटविषयी सारांशात म्हटले आहे की, “फेक न्यूजच्या नियमित प्रकाशनामुळे या वेबसाइटची विश्वासार्हता शून्य आहे.” आम्ही याबद्दल विश्वसनीय मीडिया रिपोर्ट्सचा सुद्धा तपास केला मात्र संबंधित माहिती कुठेही आढळली नाही.

आणखीन अचूक उत्तरासाठी, आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या मीडिया विभागाशी ईमेलद्वारे संपर्क साधला. आम्हाला समजले की, ही चुकीची माहिती १७ मे २०२३ रोजी यूके मधील मायोकार्डिटिसवरील DON मधील माहितीमधून घेतली आहे. मात्र यात चुकीचे बदल करण्यात आले आहेत. मूळ माहितीमध्ये मातांच्या लसीकरण स्थितीचा उल्लेख नाही. WHO ने कधीही, या अहवालात किंवा इतर कोणत्याही अहवालात, UK मधील नवजात मुलांमध्ये मायोकार्डिटिसच्या वाढीचा संबंध आईच्या कोविड लसीकरण स्थितीशी किंवा कोणत्याही लसीकरणाशी जोडलेला नाही. या दाव्यांना कोणताही आधार नाही.”

या मेलमध्ये युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडमधील मायोकार्डिटिसच्या रोगाच्या उद्रेकाच्या बातम्यांचा संदर्भ देण्यात आला आहे.

https://www.who.int/emergencies/disease-outbreak-news/item/2023-DON465

बातमीमध्ये लिहिले आहे की…

५ एप्रिल २०२३ रोजी, युनायटेड किंगडमच्या नॅशनल IHR फोकल पॉइंटने WHO ला वेल्समधील एन्टरोव्हायरस संसर्गाशी संबंधित नवजात मुलांमध्ये गंभीर मायोकार्डिटिसमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली. जून 2022 ते एप्रिल 2023 दरम्यान, पॉझिटिव्ह एन्टरोव्हायरस पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन (PCR) चाचणीसह रुग्णालयात दाखल झालेल्या दहा नवजात बालकांना मायोकार्डिटिस असल्याचे आढळून आले. दहापैकी सात प्रकरणांमध्ये एकतर coxsackie B3 किंवा coxsackie B4 सबटाइपिंग होते. 5 मे 2023 पर्यंत, एक रुग्ण रुग्णालयात दाखल होता आणि एकाचा मृत्यू झाला होता.

निष्कर्ष: जागतिक आरोग्य संघटनेने पूर्णतः लसीकरण झालेल्या माता गंभीर हृदयविकार असलेल्या बाळांना जन्म देत आहेत, असे कुठेही सांगितलेले नाही. व्हायरल पोस्ट बनावट आहे.