जगभरात करोना व्हायरसचं संकट अजुन काही शमलेलं नाही. अमेरिका आणि युरोपीय देशात करोनाची चौथी पाचवी लाट सुरूये. तर दुसरीकडे आफ्रिका देशातील बोत्सवानामध्ये करोना व्हायरसचा व्हेरिएंट आढळला आहे. या व्हेरिएंटचं नामकरण B.1.1.529 असं करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) या व्हेरिएंटला ‘ओमिक्रॉन’ असं नाव दिलंय. पण आता या नामकरणावरून वेगवेगळे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. डब्ल्यूएचओने करोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या नामकरणात ‘Nu’ किंवा ‘Xi’ ऐवजी ‘ ओमिक्रॉन’ हे नाव का ठेवले? असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय. पण यामागचं कारण सुद्धा तितकंच खास आहे. कुणाचीही बदनामी होण्यापासून वाचवण्यासाठी डब्ल्यूएचओने हे पाऊल उचलले असल्याचे जाणकारांचे मत आहे. या प्रकारांची वैज्ञानिक नावं जीनोम अनुक्रम आणि संशोधन यासारख्या इतर उपयोगांसाठी वापरली जात आहेत. आता संपूर्ण प्रकरण काय आहे ते समजून घेऊया.
Covid-19 Pandemic: WHO ने नवीन करोनाच्या नामकरणात ग्रीक वर्णमालेतील दोन अक्षरे का गाळली? Omicron नाव का दिलं? जाणून घ्या…
जगभरात करोना व्हायरसचं संकट अजुन काही शमलेलं नाही. आफ्रिका देशातील बोत्सवानामध्ये करोना व्हायरसचा व्हेरिएंट आढळला आहे. या नव्या व्हेरिएंटचं नामकरण 'ओमीक्रॉन' असं केलंय. मात्र या नामकरणावरून आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-11-2021 at 21:52 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who avoids greek alphabet xi and names new covid variant omicron heres why covid variant of concern named omicron prp