Who Selected Sachin Tendulkar For Team India In International Cricket : आख्ख्या क्रिकेट विश्वात भल्या भल्या गोलंदाजांचा धुव्वा उडवणारा सचिन रमेश तेंडुलकर बघता बघता ‘क्रिकेटचा देव’च बनला. क्रिकेटप्रेमींनी खचाखच भरलेलं स्टेडियम ‘सचिन-सचिन’च्या घोषणांनी अजूनही दुमदुमतं. अवघ्या १६ वर्षी टीम इंडियाची जर्सी घालून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनने अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली. जगात नंबर वन क्रिकेटर म्हणून ठसा उमटवणाऱ्या सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक महत्वाच्या व्यक्तींचं योगदान लाभलं. दिग्गज प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांनी मार्गदर्शन केल्यामुळे सचिनच्या नसा नसात क्रिकेटचं वेड शिरलं. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनची भारतीय क्रिकेट संघात निवड कुणी केली? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील गावसकर, कपिल देव, मोहम्मद अजहरुद्दीन, दिलीप वेंगसरकर या दिग्गज क्रिकेटपटूंनी सचिनला नेहमीच मार्गदर्शन केलं. पण एका व्यक्तीने सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी दिली अन् सचिननं मोठ मोठ्या मैदानात धमाकाच केला. बीसीआयचे माजी अधिकारी आणि क्रिकेटर राज सिंग डूंगरपुर असं या व्यक्तीचं नाव आहे. १९ डिसेंबर १९३५ ला राजस्थानमध्ये एका शाही कुटुंबात राज सिंग डूंगरपुर यांचा जन्म झाला होता. १२ सप्टेंबर २००९ ला डूंगरपुर यांचं निधन झालं. त्यांनी १६ वर्ष फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलं आणि २० वर्ष भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं कामकाज त्यांनी पाहिलं. डूंगरपुर दोनदा भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष होते आणि सचिन तेंडुलकरची टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये निवड करणारे ते पहिले क्रिकेटर होते.

नक्की वाचा – India Vs West Indies : भारताला विजय अनिवार्य!

कोण होते राज सिंग डूंगरपुर ?

जागतिक क्रिकेटमध्ये राज सिंग डूंगरपुर हे ‘राजभाई’ म्हणून लोकप्रीय होते. १९८९-९० मध्ये ते भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष होते. याचदरम्यान त्यांनी सचिनची १६ व्या वर्षी राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड केली. सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळवून देण्यासाठी त्यांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे नियमही बदलले. १४ वर्षांचा असताना सचिनने सीसीआयच्या ड्रेसिंगरुममध्ये म्हटलं होतं की, मला संधी देण्यासाठी डूंगरपुर यांनी नियम बदलले. राज सिंग डुंगरपूर वेगवान गोलंदाज (राईट आर्म) होते. राजस्थानसाठी त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ८६ सामन्यांमध्ये २०६ विकेट्स घेतल्या. तसंच रणजी ट्रॉफीच्या तीन सीजनमध्ये २१ विकेट्स घेतल्याची कामगिरीही त्यांनी केली आहे.

Former Cricketer Raj Singh Dungarpur

सचिन तेंडुलकरने माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, “मी पहिल्या रणजी क्रिकेटच्या हंगामात यशस्वी झालो. त्यावेळी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी माझ्या निवडीबाबत चर्चा सुरु होत्या. त्यावेळी डूंगरपुर हे निवड समितीचे मुख्य सदस्य होते. तेव्हा त्यांनी मला वेस्ट इंडिज टूरसाठी जायचं नाही, असं सांगितलं. मला त्यांनी रणजी ट्रॉफीच्या सेमी फायनल आणि फायनल सामन्यात लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगितलं. या सामन्यांमध्ये धावा केल्यावर तू दहावीच्या परीक्षेची तयारी कर. तू असंच खेळत राहिला, तर टीम इंडियासाठी खेळण्याची संधी तुला लवकरच मिळेल, असाही विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आणि त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मला मिळाली.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who introduced sachin tendulkar in international cricket team india selection committee god of cricket bcci indian cricket team nss