सोशल मीडियावर सध्या एक चिमुकला तुफान चर्चेत आहे. ”आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यावर एका गोंडस मुलाचा डान्स व्हिडीओ तुम्ही एव्हाना पाहिला असावा. त्याचे हावभाव पाहून तुम्हीदेखील त्याचे चाहते झाले असाल. सर्वांच्या मनाला भुरळ घालणारा आणि रातोरात स्टार झालेला हा चिमुकला नक्की आहे तरी कोण? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल ना. चला तर मग जाणून घेऊ कोण आहे हा चिमुकला.

”आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यावर सुंदर अभिनय करणाऱ्या या चिमुकल्याचं नाव आहे साईराज गणेश केंद्रे आणि तो फक्त चार वर्षांचा आहे. साईराज हा बीडमधील परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथे राहतो. तो सध्या ज्युनियर केजीमध्ये शिकत आहे. साईराजनं स्वत:च हे गणपती बाप्पाचं गाणं निवडलं आणि त्यावर गोंडस हावभाव देत रील्स तयार केली. साईराज अत्यंत हुशार आणि उत्साही असल्याचं या व्हिडीओवरून दिसतं कारण- त्यानं गाण्याचे बोल अचूक पाठ केले आहेतच; पण त्यावर लिप्सिंक (Lipsync)देखील अचूक केलं आहे. एवढंच नव्हे, तर गाण्यातील ”कसा टुक मुक बघतोय चांगला” या ओळीवर त्यानं जो गोंडस अभिनय केला आहे ते पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. त्याच्या अभिनयकौशल्य आणि गोंडसपणामुळे अल्पावधीमध्येच तो सोशल मीडियावर चर्चेत आलाय. हा व्हिडीओ पोस्ट केल्यापासून आतापर्यंत त्याचा हा व्हिडीओ ४.५ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे.

Girl Juggling On Chandra Song Vs Beatboxing
‘चंद्रा’ गाण्यावर चिमुकलींची जुगलबंदी! ठसकेबाज लावणीला बीट बॉक्सिंगची साथ; VIDEO पाहून अमृता खानविलकरची कमेंट, म्हणाली…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
Paaru
Video: पारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद आदित्य वाचवू शकणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस
In the viral video the little girl has danced so amazingly she reminds Amruta Khanvilkar Dance in Vaje ki bara song
“वाजले की बारा…” गाण्यावर चिमुकलीने सादर केली भन्नाट लावणी, थेट अमृत्ता खानविलकरला देतेय टक्कर, Viral Video एकदा बघाच….

हेही वाचा – तरुणाला करायचे होते मनाप्रमाणे लग्न, महादेवाची केली पूजा, इच्छा पूर्ण झाली म्हणून मंदिरातून चोरले शिवलिंग

रिल्स तयार करण्याची साईराजची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीदेखील तो चर्चेत आला आहे. तुम्हाला आठवत असेल, ”ए आई, मला पावसात जाऊ दे, एकदाच गं, भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे” या कवितेच्या ओळीवर एका चिमुकल्याचा गोंडस व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो गोंडस व्हिडीओदेखील साईराजचा आहे, तेव्हा तो फक्त दीड वर्षाचा होता. त्याच्या वडिलांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पुन्हा पोस्ट केला आहे. म्हणतात की, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसेच काहीसे साईराजबरोबरही झाले आहे. साईराजचा हा व्हिडीओ पाहूनच अनेकांना हा उत्तम कलाकार होणार, असे वाटले होते आणि आता त्याची वाटचाल त्या दिशेने सुरू झाली आहे, असे दिसते.

हेही वाचा – चालत्या Mahindra XUV700 कारमध्ये चालक बसला मागच्या सीटवर; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

साईराजची कलाकारी पाहून त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या वेगवेगळ्या रील्स तयार करायला सुरुवात केली आहे. साईराजच्या या कलागुणांना त्याचे आई-वडील प्रोत्साहन देत असल्याचे दिसते. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये साईराज सांगतो, ”त्याला अभिनय करायचा आहे आणि अभिनेता रितेश देशमुखसारखा अभिनय करायचा आहे.”

हेही वाचा – Google चे सीईओ सुंदर पिचाई यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा; वडिलांना पाठवलेल्या पहिल्या ईमेलचा सांगितला किस्सा …

दरम्यान, त्याचा पुन्हा नवा व्हिडीओ चर्चेत येत आहे. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त हा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे. राधा कुठे गेली बघा या गाण्यावर त्याने ही रिल्स पोस्ट केली आहे. नेहमीप्रमाणे त्याच्या गोंडस हावभावांनी त्याने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तुम्ही पाहिला का त्याचा नवा व्हिडीओ. पाहिला नसेल, तर लगेच पाहा.

Story img Loader