आयपीएलचा थरार सध्या अंतिम टप्यात पोहचला आहे. सर्वोत्कृष्ट चार संघामध्ये आजपासून लढत होणार आहे. आयपीएलमध्ये अनेक नव्या खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली आहे. खेळाडूंप्रमाणे चाहतेही एका रात्रीत स्टार झाले आहेत. अशीच एक चाहती सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान चाहतीने देशभरातील तरूणांचे ह्रदय जिंकले आहे. दीपिका बंगळुरू संघाची चाहती आहे. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामच्या प्रोफाईल #theRCBgirl असे लिहिले आहे. बंगळुरूच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर फक्त तिचीच चर्चा होती.
बंगळुरूच्या विजयानंतर इतर चाहत्यांप्रमाणे दीपिकाही सेलिब्रेशनमध्ये व्यस्त होती. लाल रंगाचा टॉप घातलेली दीपिका, तिची स्टाईल, लुक, आत्मविश्वास या सर्व गोष्टीमुळे मैदानातील काही कॅमेरामनने तिचे फोटो काढले. दीपिकाचे हे फोटो मैदानातील स्क्रीनवर झळकले आणि त्यानंतर अवघ्या काही तासात बंगळुरूची ‘सर्वात मोठी चाहती’ म्हणून घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे यानंतर दिपीकाला ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळख मिळाली आहे.
यंदाच्या आयपीएलमधील अखेरच्या सामन्यात बंगळुरूने हैदराबाद संघाचा पराभव करत स्पर्धेचा शेवट गोड केला. यासामन्यानंतर एका रात्रीत दीपिका सोशल मीडियावर चर्चेत आली. लोकांनी इन्स्टाग्रामवर दीपिकाच्या नावाने बटावट खाती उघडण्यास सुरूवात केल्यानंतर तिने एक पोस्ट टाकत आपलं एकमेव खातं असल्याचा खुलासा केला.