Ukraine-Russia War: ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनमधून सुटका करण्यात आलेल्या भारतीयांना घेऊन येणारे आणखी एक विमान आज राजधानी दिल्लीत पोहोचले. यादरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी युक्रेनमधून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत केलं. स्वागत करताना त्यांनी वेगवेगळ्या भाषांचाही वापर केला. यामुळेच स्मृती इराणींचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय विद्यार्थ्यांना संबोधित करताना स्मृती इराणी म्हणाल्या, “घरी तुमचे स्वागत आहे! तुमचे कुटुंबीय तुमची वाट पाहत आहेत. तुम्ही अनुकरणीय धैर्य दाखवले आहे… फ्लाइट क्रूचेही आभार.” यानंतर त्यांनी केरळ मधलं कोण आहे? महाराष्ट्रातून कोण आहे ? असं त्यांनी त्या त्या राज्यातील भाषेत विद्यार्थांना विचारलं.

(हे ही वाचा: Viral Photo: ओळखा पाहू; हा फोटो भारतातील कोणत्या राज्यातील आहे?)

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोत लपलेला हिम बिबट्या तुम्ही शोधू शकता का? फोटोग्राफरच होतय कौतुक)

दरम्यान, युक्रेनमधून परतलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याने सांगितले की, भारतात परत आल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. २५ तारखेला निघालो आणि आज आलो. अजूनही अनेक मुलं तिथे अडकली आहेत, त्यांना सरकारने लवकर बाहेर काढावं. यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन एक विशेष विमान पोलंडहून दिल्लीला पोहोचले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नंतर बुखारेस्टहून भारतीय नागरिकांना घेऊन दुसरे विशेष विमान दिल्लीला पोहोचले. या विमानातून येणाऱ्या भारतीय नागरिकांचे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्वागत केले.

(हे ही वाचा: ‘या’ देसी जुगाडासमोर मोठी मशीनही फेल; हा viral video एकदा बघाच!)

त्याचवेळी भारतीय हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर विमान आज सकाळी युक्रेनसाठी मदत सामग्री घेऊन रोमानियाला रवाना झाले. या विमानाने रोमानियामधून त्या भारतीय नागरिकांनाही परत आणणे अपेक्षित आहे, जे युद्धग्रस्त युक्रेनमधून सीमा ओलांडून रोमानियामध्ये पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत. भारताने मंगळवारी मानवतावादी मदत म्हणून औषधे आणि इतर मदत सामग्रीची पहिली खेप पोलंडमार्गे युक्रेनला पाठवली.

(हे ही वाचा: चालत्या रुग्णवाहिकेत दारू पार्टी! बिअर पीत असलेल्या लोकांचा Video Viral)

विशेष म्हणजे रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर तेथे अनेक प्रकारचे मानवतावादी संकट उभे राहिले आहे. या मानवतावादी संकटाचा सामना करण्यासाठी भारताने युक्रेनला मदत सामग्री पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी कारवाईमुळे अनेक भारतीय नागरिकही तेथे अडकले आहेत, ज्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत विशेष विमानसेवा चालवत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is from maharashtra smriti irani welcomes indian students returning from ukraine ttg