World’s first four-month-old baby to identify 100+ flashcards Marathi अवघ्या ४ महिन्यांच्या बाळाने आपल्या कौशल्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आंध्र प्रदेशातील रहिवासी असलेल्या कैवल्याची नुकतीच नोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. फक्त ४ महिन्यांची ही मुलगी भाज्या, चित्रे, प्राणी, पक्षी अशा १२० गोष्टी ओळखता येतात. तिचे कौशल्य पाहून तुम्ही ती किती हुशार आहे हे लक्षात येते. कैवल्याच्या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अवघ्या चार महिन्याच्या बाळाने केला जागतिक विक्रम
कैवल्याची आई हेमा यांनी सर्वप्रथम आपल्या मुलीचे हे कौशल्य ओळखले. कैवल्याचा व्हिडीओ बनवून जगाला का दाखवू नये, असा विचार त्यांनी केला. हेमाने हा व्हिडिओ नोबल वर्ल्ड रेकॉर्डला पाठवला आहे. नोबल वर्ल्ड रेकॉर्ड्सने कैवल्यच्या प्रतिभेचे परीक्षण केले आणि जागतिक रेकॉर्डमध्ये तिचे नाव नोंदवले. कैवल्याला नोबल वर्ल्ड रेकॉर्डने प्रमाणपत्र दिले आहे. कैवल्याने ३ फेब्रुवारी २०२४ रोजी हा विक्रम केला. १००पेक्षा जास्त फ्लॅशकार्ड ओळखणारे जगातील पहिले चार महिन्यांचे बाळ’ असे कैवल्याचे वर्णन केले गेले.
हेही वाचा – “मैत्री असावी तर अशी!” रिक्षाचालकाबरोबर दिवसभर सैर करतोय कुत्रा; बंगळुरुमधील रिक्षाचालकाचा Video Viral
कैवल्याने काय ओळखले?
कैवल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती१२० फ्लॅशकार्ड ओळखताना दिसत आहे. या फ्लॅशकार्डमध्ये १२ फुले, २७भाज्या, २७ फळे, २७ प्राणी आणि २७ पक्षी आहेत. या व्हिडिओमध्ये कैवल्या आणि त्याचे कुटुंबांकडे पदक असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओमुळे कैवल्याचे खूप कौतुक होत आहे.
हेही वाचा – एकेकाळी मिस इंडिया होण्याचे स्वप्न पाहत होती, आज आहे IAS अधिकारी! तस्कीन खानची यथोगाथा
इतरांनीही दिली प्रेरणा
मुलीच्या कुटुंबीयांनी सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. मुलीची हे कौशल्य पाहून सुरुवातीला नोबेल वर्ल्ड रेकॉर्डमधील लोकांनाही इतरांप्रमाणेच आश्चर्य वाटले, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. नंतर, तिच्या कौशल्याची चाचणी घेतल्यानंतर, त्याने चार महिन्यांच्या कैवल्याचे नाव विश्व विक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. कैवल्याच्या आईला आशा आहे की, तिच्या मुलीची गोष्ट इतर पालकांना त्यांच्या मुलांचे कौशल्य ओळखण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी प्रेरित करेल.