आज २७ फेब्रुवारी. आजचा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे आपुलकी वाटणारी जिव्हाळ्याची आणि सर्वाधिक बोलली जाणारी ही भाषा आहे.

पबमध्ये मराठी गाणी वाजवणारा कृणाल घोरपडे

Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: दिल्लीत अजित पवार-शरद पवार भेट; युगेंद्र पवार म्हणतात, “एकत्र येण्यासाठी प्रयत्न…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Who is Telangana Thalli?
Telangana Thalli : ‘तेलंगणा थळ्ळी’ कोण आहेत? त्यांच्या नव्या पुतळ्यावरुन नेमका वाद का पेटला आहे?

मात्र, याच मराठी दिनानिमित्त जरी आजच्या तरुणाईला मराठी गाण्यांबद्दल विचारलं, तर त्यांना फारशी गाणी माहिती नसतात. मराठी असूनही हल्लीच्या पिढीची पसंती ही हिंदी गाण्यांना अधिक आहे. डीजेवर, पबमध्ये हिंदी गाण्यांवर बेभान होऊन नाचणारी तरुणाई आपण सगळ्यांनीच पाहिली. पण, तुम्हाला माहितीये का, की कोणत्या पबमध्ये मराठी गाण्यांवर तरुणाई थिरकली आहे. नाही ना… पण सोशल मीडियावर Kratex नावानं प्रसिद्ध असलेल्या कृणाल घोरपडेनं मराठी वाजलाच पाहिजे म्हणत अक्षरश: आजच्या तरुणाईला मराठी गाण्यांवर नाचायला भाग पाडलं. आज मराठी दिनानिमित्त ‘मराठी वाजलेच पाहिजे’ याची नेमकी सुरुवात कशी झाली याबद्दल जाणून घेऊ.

वडिलांशिवाय मोठं होणं…

कमी वयात वडिलांशिवाय मोठा झालेला कृणाल नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याच्या या वेगळेपणाला, त्याच्यातील प्रतिभेला खरी दिशा मिळाली ती ग्रॅमी पुरस्कारविजेते डेव्हिड गुएटा यांचा भारतात जेव्हा पहिला कार्यक्रम झाला तेव्हा. कृणालला कॉम्प्युटर इंजिनीयर व्हायचे होते. मात्र, याच शिक्षणाबरोबर त्यानं रिमिक्स गाणी तयार करण्याचा छंदही जोपासला. इलेक्ट्रिक डान्स म्युझिक शिकण्याचं प्रशिक्षण त्याला घ्यायचं होतं; मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे कृणालनं ते क्षेत्र सोडलं. डेव्हिड गुएटा यांचा भारतात शो झाला अन् कृणालनं याच क्षेत्रात काहीतरी करायचं, असं ठरवलं आणि त्याचा प्रवास सुरू झाला.

कृणाल घोरपडे याचं बालपण विरारमधील मराठी चाळीत गेलं. आजूबाजूला पूर्ण आगरी बांधवांची वस्ती. कृणाल तिथे वाढला असल्यानं घरात मराठी गाण्यांच्या कॅसेट्स आणि आजूबाजूला परिसरात वाजणारी गाणीदेखील मराठीच. त्याच्यामुळे “मी जी गाणी ऐकायचो, त्यात बहुतांश ही मराठी गाणी असतात”, असं तो सांगतो. त्यामुळे तो जेव्हा रिमिक्स बनवतो, ते मराठी गाण्यांचं असतं. इलेक्ट्रिक डान्स म्युझिक शिकताना कृणालला कळलं की, इलेक्ट्रिक म्युझिकसाठी कोणतंही वाद्य लागत नाही, तर फक्त कॉम्प्युटर लागतो. मग त्यावेळी घरात असलेल्या कॉम्प्युटरवरच त्याचा प्रवास सुरू झाला ते आज स्वत:च्या ‘हाऊस म्युझिक’पर्यंत तो येऊन पोहोचला आहे. मागच्या सहा वर्षांपासून कृणाल त्याच्या कामात सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करीत आहे.

‘झुक झुक आगीन गाडी’ या मराठी बालगीतांचा आवाज पंचतारांकित हॉटेलमध्ये घुमला

कृणालनं @whyfal या यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “मला खऱ्या अर्थानं ओळख मिळाली ती कोरोनानंतर म्हणजेच लॉकडाऊननंतर”, असं सांगितलं. कोरोनामुळे संपूर्ण देश ठप्प झाला आणि त्यात कृणालची देखील नोकरी गेली. तेव्हा एका मित्रानं त्याच्या कंपनीत कृणालला काम दिलं. मग लॉकडाऊनमध्ये त्यानं त्याची काही गाणी इन्स्टाग्रामवर पोस्ट करायला सुरुवात केली. त्या गाण्यांना चांगला प्रतिसाद येऊ लागला. तेव्हा त्यानं आपण बालवाडीमध्ये ‘मामाच्या गावाला जाऊया’ हे जे बालगीत म्हणायचो ते रीक्रिएट केलं आणि सोशल मीडियावर अपलोड केलं. त्याला काही मिलियनमध्ये व्ह्युज आले. अनेक सेलिब्रिटींनी ते गाणं शेअर केलं, काहींनी त्याच्यावरती रील्स बनवल्या आणि आणि कृणाल व्हायरल होऊन लोकप्रिय होऊ लागला.

‘मराठी वाजलाच पाहिजे’

अनेक मोठमोठ्या पबमध्ये मराठी गाण्यांना चक्क नकार दिला जातो. मग महाराष्ट्रातच मराठी नाही तर आहे कुठे असा प्रश्न त्याला पडला. मराठी गाणी वाजवली जात नाहीत, या गोष्टीची त्याच्या मनात खूप चीड निर्माण व्हायची. याच रागातून कृणालने एक पोस्ट लिहिली आणि त्याच्या शेवटी हॅशटॅग लिहिला ‘मराठी वाजलाच पाहिजे’ आणि ती पोस्ट इतकी व्हायरल झाली की, अनेक सेलिब्रिटींनीदेखील त्यांच्या वॉलवरती कृणालची पोस्ट शेअर केली होती. आणि इथूनच या चळवळीला सुरुवात झाली. शेवटी या सगळ्याचं श्रेय कृणाल त्याच्या आईला देतो. तसेच प्रेक्षकच तुमचे परीक्षक असतात. त्यामुळे ट्रोलिंगला न घाबरता, तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा, असंही तो तरुणाईला सांगतो. तसेच आपली ही मराठी गाणी परदेशात वाजवायची, हे त्याचं लक्ष्य असल्याचंही त्यानं @whyfal या यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

कृणालने राज ठाकरेंची घेतली भेट

राज ठाकरे नेहमीच मराठी भाषेसाठी आग्रही असतात. जगात भाषेमुळे तुम्ही ओळखले जाता. त्यामुळे भाषा हीच तुमची ओळख आहे, मी मराठी आहे. यापेक्षा मी मराठी बोलणारा माणूस आहे. हे समजले पाहिजे. तुम्ही मराठी भाषा बोलणारा माणूस असल्याचे भाषेमुळे तुम्ही ओळखले जातात. त्यामुळे भाषा ही तुमची ओळख असली पाहिजे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमी बोलत असतात. याच राज ठाकरेंचीही कृणालनं भेट घेतली. नुकताच त्यानं राज ठाकरेंसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी कृणालच्या ‘मराठी वाजलाच पाहिजे’ या चळवळीचं राज ठाकरेंनीही कौतुक केलं.

Story img Loader