Dolly Chaiwala Meets Bll Gates : इंटरनेटवर सध्या डॉली चहावाला या व्यक्तीची फक्त चर्चा सर्वत्र होत आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर इंटरनेटवर प्रसिद्ध असलेल्या या चहा विक्रेत्याबरोबर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते आहे की, डॉली चहावाल्याने त्याच्या खास शैलीमध्ये बनवलेल्या चहाचा आस्वाद बिल गेट्स घेताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. अनेकांना प्रश्न पडला की, कोण आहे डॉली चहावाला जो चक्क बिल गेटस् यांना भेटला? नक्की काय आणि कसे घडले? जाणून घेऊ या…

बिल गेट्स यांनी शेअर केला नागपुरच्या डॉली चहावाल्याचा व्हिडीओ

बिल गेट्स यांनी चहा विक्रेत्या डॉलीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला. व्हिडीओ शेअर करताच क्षणार्धात तुफान व्हायरल झाला. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले “भारतात, तुम्ही जिथेही बघाल तिथे तुम्हाला नावीन्य सापडेल, अगदी साध्या चहाच्या एक कप तयार करण्यामध्येही!” व्हिडीओमध्ये दिसते की, सुरुवातीला बिल गेट्स हे स्टॉल शेजारी उभे आहेत. त्यानंतर ते डॉली चहा विक्रेत्याला “कृपया,एक चहा द्या,” अशी विनंती करतात. त्यानंतर डॉली चहा विक्रेता त्याच्या खास शैलीमध्ये चहा तयार करतो. डॉली बिल गेट्स यांच्या हातामध्ये चहा देतो आणि त्यानंतर ते म्हणतात, ‘व्वा, डॉलीचा चहा.”

will bring postal stamps books and plays on chhatrapati tararani maharani says bjp minister ashish shelar
ताराराणींवर टपाल तिकीट, पुस्तक, नाटक आणणार; आशिष शेलार, साडेतीनशेवी जयंतीनिमित्त घोषणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
If Diva Ratnagiri train does not start from Dadar then Gorakhpur train will be stopped
दिवा रत्नागिरीला दादरवरून सुरू न झाल्यास गोरखपूर रेल्वेगाडी रोखू , प्रवाशांचा इशारा
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
ankita walawalkar aka kokan hearted girl first kelvan
‘कोकण हार्टेड गर्ल’ची लगीनघाई! अंकिता-कुणालचं पार पडलं पहिलं केळवण, फोटो आला समोर, लग्नपत्रिका पाहिलीत का?
cm devendra fadnavis loksatta news
आमच्या कुटुंबात ‘तिच’ सर्वाधिक प्रगल्भ, फडणवीस कोणाबाबत बोलले?
Who is Nikhil Kamath ?
Who is Nikhil Kamath : पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच्या पहिल्या पॉडकास्टमुळे चर्चेत आलेले निखिल कामथ कोण आहेत?

हेही वाचा – हाडे गोठवणाऱ्या थंडीत जोडप्याने केलं लग्न! स्पिती व्हॅलीतील Destination Wedding व्हिडीओ बघाच

कशी झाली बिल गेट्स आणि डॉली चहावाला यांची भेट! (How did he meets Bill Gates)

बिल गेट्स यांना भारतातील दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या नावीन्यपूर्णतेबद्दल नेहमीच कौतुक वाटते. डॉली चहावाल्याची चहा विकण्याची हटके स्टाईल बिल गेट्स यांनाही आवडली. म्हणूनच नागपुरच्या डॉली चहावाल्याला थेट मायक्रोसॉफ्टच्या हैद्राबादमधील ऑफिसमध्ये बोलवण्यात आले. त्याच्यासाठी खास चहाचा स्टॉल देखील तयार करण्यात आला. डॉली चहावाल्याला त्याच्या हटके स्टाईलमध्ये चक्क बिल गेट्स यांना चहा देण्याची संधी मिळाली.

हेही वाचा – नागपूरच्या डॉली चहा विक्रेत्याची बिल गेट्सनाही पडली भुरळ; VIDEO शेअर करत म्हणाले, ‘साधा कप चहा…’

बिल गेट्स कोण आहेत हे डॉलीला माहिती नव्हते! (Dolly Chaiwala didn’t know who is Bill Gates)

चहा विक्रेत्या डॉलीने एनआयला माहिती देताना सांगितले की, “मला अजिबात माहिती नव्हते की ते कोण आहेत. मला वाटले ते परदेशी व्यक्ती आहे म्हणून मी त्याला चहा द्यावा. पण दुसऱ्या दिवशी मी जेव्हा नागपुरला परत आलो तेव्हा मला समजले मी कोणाला चहा दिला होता. ते बिल गेट्स होते. आम्ही एकेमेकांशी अजिबात बोललो नाही. ते माझ्या शेजारी उभे होते आणि मी माझ्या पद्धतीने चहा बनवत होतो. मी साऊथचे सिनेमे बघतो आणि त्यातूनच मी शैली शिकलो. आज मला वाटतं की, मी ‘नागपूरचा डॉली चहावाला’ झालोय. मला खूप अभिमान वाटतो आहे. ‘ भविष्यात मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना चहा देण्याची इच्छा आहे”

हेही वाचा – “तुम्ही जितके निर्लज्ज व्हाल तितका तुमचा पगार वाढेल”, ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देत आहे निर्लज्ज होण्याचे प्रशिक्षण

कोण आहे बिल गेट्स यांना भेटलेला डॉली चहावाला? (who is dolly chaiwala)

डॉली चहावाला गेल्या १५ ते २० वर्षांपासून चहा तयार करण्याच्या आणि विकण्याच्या त्याच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीमुळे इंटरनेटवर चर्चेत होता. त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये म्हटले आहे की, तो महाराष्ट्रातील नागपूर येथील “प्रसिद्ध” चहा-विक्रेता आहे. फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर त्याचे १० लाखांपेक्षा पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. चहा देण्याच्या त्याच्या वेगळ्या शैलीसह त्याचा पोशाख देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतो. त्याने पिवळ्या रंगाचा गॉगल देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचा चहाचा स्टॉल नेहमीच चहाप्रेमींनी गजबजलेला असतो. डॉली चहावालाल्या त्याच्या शैलीमुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांद्वारे ‘जॅक स्पॅरो ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळखला जातो.

Story img Loader