गिर्यारोहक प्रियंका मोहिते हिने इतिहास रचला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील प्रियंका, गुरुवारी कांचनजंगा पर्वतावर चढाई केल्यानंतर ८,००० मीटरपेक्षा जास्त उंची असलेली पाच शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
३० वर्षीय प्रियांका मोहितेच्या नावावर एकापेक्षा एक विक्रमांची नोंद आहे. प्रियंका मोहिते हिने गुरुवारी संध्याकाळी ४ वाजून ५२ मिनिटांनी जगातील तिसर्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कांचनजंगा सर करून ही मोहीम पूर्ण केली आहे. या पर्वताची उंची ८,५८६ मीटर आहे.
प्रियांका मोहितेला २०२० मध्ये तेनझिंग नोर्गे साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने एप्रिल २०२१ मध्ये अन्नपूर्णा शिखर सर केले होते जे जगातील दहावे सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची ८,०९१ मीटर आहे. ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीची ५ शिखरे सर करणारी ती पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. प्रियंका मोहितेने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट देखील सर केले आहे.
माउंट एरेस्टची उंची ८,८४९ मीटर आहे. तिने ल्होत्से पर्वतही सर केला आहे. या पर्वताची उंची ८,५१६ मीटर आहे. वयाच्या ३०व्या वर्षी प्रियंका मोहितेने ८,४८५ मीटर उंचीचा मकालू पर्वत देखील सर केला आहे. तिने ८,८९५ मीटर उंचीवरील किलीमांजारो पर्वतावरही चढाई केली आहे.
“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर
प्रियंका मोहितेला नेहमीच पर्वत चढण्याची आवड होती. त्याने किशोरवयातच पर्वत चढायला सुरुवात केली. त्याच वयात तिने महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांवर चढाई केली होती. २०१२ मध्ये तिने हिमालयातील गढवाल विभागातील बंदरपंच पर्वतावर चढाई केली होती.