WWE कुस्ती स्पर्धा म्हटलं की आपल्या भारतातील द ग्रेट खली आणि जिंदर महाल या दोघांनी नावं समोर येतात. आता वीर महान या कुस्तीपटूने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. वीरने आतापर्यंत WWEच्या मुख्य इव्हेंटमध्ये भाग घेतला असून सलग १२ वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे वीर महानची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. वीर महानचं मूळ नाव रिंकू सिंग राजपूत आहे. वीर महान यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गोपीगंज येथे झाला. वीर महान ६ फूट ४ इंच उंच आणि १२५ किलो वजनाचा आहे. आखाड्यातील त्यांचा वेगळा लूक, काळे कपडे, कपाळावरचे चंदन आणि लांबलचक दाढी सर्वांचं लक्ष वेधून घेतं. कपाळावरील असलेले पारंपरिक भारतीय चंदन तिलक त्यांची ओळख दर्शवते. आज डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये रिंकू सिंग राजपूत आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमेरिकेच्या प्रसिद्ध बेसबॉल संघाने करारबद्ध केले होते. त्यानंतर डिस्नेने रिंकू सिंगच्या संघर्षावर ‘द मिलियन डॉलर आर्म’ नावाचा चित्रपटही बनवला आहे. वीर महान यांनी टाईम्स नाऊशी बोलताना सांगितले की, “भारतातील एका छोट्या गावात वाढल्यामुळे, जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हे नेहमीच स्वप्नासारखे वाटले आणि मला ही संधी दिल्याबद्दल मी डब्ल्यूडब्ल्यूईचा खूप आभारी आहे.”

जानेवारी २०१८ मध्ये डब्ल्यूडब्ल्यूईसोबत करार केला आणि NXT टॅग टीम इंडस शेरमध्ये स्पर्धा झाली. मे २०२० मध्ये वीर या नावाने मुख्य रोस्टरवर आला. २०२१ मध्ये हे नाव वीर महान असे नाव मिळाले. डब्ल्यूडब्ल्यूई अनेक महिन्यांपासून वीर महानचे विग्नेट्स प्रसारित करत आहे. त्याच्या आगमनाचे टीझर दाखवत आहे.