युक्रेन आणि रशियादरम्यान गेल्या साथ दिवसांपासून युद्ध सुरु आहे. अशा परिस्थितीत आजकाल जगात फक्त दोनच व्यक्तींची सर्वाधिक चर्चा होत आहे. पहिले म्हणजे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि दुसरे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की. मात्र, यापैकी पुतिन हे जागतिक नेते म्हणून सर्वाधिक चर्चेत आहेत. अशा परिस्थितीत लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याची उत्सुकता असते. लोकांना पुतिन यांची मालमत्ता, कुटुंब, वैयक्तिक आयुष्य आणि त्यांच्या कथित गर्लफ्रेंडबद्दल जाणून घ्यायचे आहे. तर जाणून घेऊया पुतिन यांची कथित गर्लफ्रेंड कोण आहे आणि ती आजकाल युद्धाच्या दरम्यान काय करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लक्झरी लाइफ, महागडे छंद इत्यादींमुळे राष्ट्राध्यक्ष पुतिन इतर राष्ट्रप्रमुखांपेक्षा वेगळे ठरतात. पुतिन यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य मोठ्या प्रमाणात गुप्त ठेवले असले तरी त्यांची छायाचित्रे प्रसारमाध्यमांमध्ये येत राहतात. पुतिन यांचे पहिले लग्न १९८३ मध्ये फ्लाइट अटेंडंट ल्युडमिला श्क्रेबनेव्ह यांच्यासोबत झाले होते. तेव्हा ३० वर्षीय पुतिन हे केजीबी एजंट होते. त्यावेळी ल्युडमिला २५ वर्षांच्या होत्या. त्याचबरोबर पुतीन यांच्या कथित गर्लफ्रेंडबाबतही अनेक बातम्या ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत.

चौफेर विरोधामुळे व्लादिमीर पुतिन यांच्या रागाला उरली नाही सीमा; निदर्शने करणाऱ्या लहान मुलांनाही टाकलं तुरुंगात

गेल्या दशकापासून, पुतिन यांचे नाव ३८ वर्षीय अलिना काबाएवाशी जोडले गेले आहे. ती ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती देखील आहे. अलिना ही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या जुळ्या मुलांची आई असल्याचंही म्हटलं जातं. २००८ साली पुतिन यांचे नाव पहिल्यांदा अलिनासोबत जोडले गेले होते. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अलिना हिला ‘फर्स्ट लेडी ऑफ रशिया’ म्हटले जाऊ लागले. तथापि, दोघांनीही जाहीररित्या या गोष्टीला नकार दिला असला तरीही त्यांच्या नात्याच्या अफवा थांबल्या नाहीत. दोघांचा साखरपुडा आणि नंतर लग्न झाल्याचं बोललं जात होतं.

२०१६ मध्ये अलिना सार्वजनिक ठिकाणी अंगठी घालून दिसली होती. त्यामुळे या अफवांना आणखी बळ मिळाले. २०१७ मध्ये एलेना गरोदर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यानंतर ती एका जिम्नॅस्टिक स्पर्धेत लूज फिटिंग ड्रेसमध्ये दिसली. बेबी बंप लपवण्यासाठी त्याने तो ड्रेस घातला असल्याचे बोलले जात होते.

पुतिन यांचं युक्रेननंतरचं टार्गेट ठरणार ‘हा’ देश; बेलारुसच्या राष्ट्रपतींनी चुकून उघड केलं गुपित

अलिना काबाएवा ही एक रशियन राजकारणी, मीडिया मॅनेजर आणि निवृत्त रिदमिक जिम्नॅस्ट आहे. अलिनाचा जन्म १२ मे १९८३ रोजी सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या उझबेकिस्तानमध्ये झाला. अलिनाचे वडील मरात काबाएवा एक व्यावसायिक फुटबॉल खेळाडू होते. सिडनी येथे २००० च्या अथेन्स गेम्समध्ये, अलिनाने तालबद्ध जिम्नॅस्टमध्ये कांस्यपदक जिंकले. तर, २००४ च्या अथेन्स गेम्समध्ये तिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

अलिनाने तिच्या कारकिर्दीत २ ऑलिम्पिक पदके, १४ जागतिक चॅम्पियनशिप आणि २१ युरोपियन चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर अलीनाने राजकारणात प्रवेश केला. युनायटेड रशिया पक्षाकडून तिला संसद सदस्य बनवण्यात आले. यानंतर तिला रशियाची सर्वात मोठी मीडिया कंपनी नॅशनल मीडिया ग्रुपची चेअरपर्सन बनवण्यात आले. मात्र, गेल्या २ वर्षांपासून ती कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसली नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is vladimir putin alleged girlfriend know some interesting things about her pvp