Viral video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओज हास्याने भरलेले असतात तर काही थक्क करणारे असतात. एखाद्याचा मूड खराब असेलतर ती व्यक्ती लहान मुलांचे व्हिडीओ पाहत असते. कारण त्यामुळे आपला मूड चेंज होत असतो. मुलांचे काही व्हिडीओ असे असतात की, काही लोकं पटकन फ्रेश होतात. सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्यामुळे लोकं लहान मुलांचे व्हिडीओ तयार करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मेडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लहान मुलं कधी निरागस तर कधी खोडकर असतात. अशा मुलांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केले जातात जे लोकांना पाहायला देखील आवडतात. सध्या अशाच एक खोडकर मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो पाहून तुम्हीह पोट धरुन हसाल.लहान मुले खूपच गोंडस आणि निरागस असतात. ते आजूबाजूला जे पाहतात ऐकतात ते लगेच आत्मसात करतात.तसेच आई-वडिलांनी जे सांगितलंय तसंच ते वागत असतात. अशाच एका चिमुकल्याला शाळेमध्ये शिक्षकांनी रावणाचं वध कुणी केला असा प्रश्न विचारला. यावर या चिमुकल्यानं असं उत्तर दिलं की ते ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सर चिमुकल्याला विचारतात की, बेटा देवांश रावणाचा वध कुणी केला? यावर त्यानं उत्तर दिलं की, “सर आईची शपथ घेऊन सांगतो मी पाणी प्यायला गेलेलो मी नाही मारलं” सरांनी अचानक प्रश्न विचारल्यामुळे तो थोडा घाबरला होता मात्र चिमुकल्याचा निरागसपणा पाहून तुम्हालाही हसू येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “बघ बाळा फरक फक्त शिक्षणाचा”; वयात येणाऱ्या मुलांना प्रत्येक बापानं दाखवावा असा VIDEO; पाहून आयुष्य बदलेलं

सोशल मीडियावर हा व्हिडीओ aachary_shailendr0216 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “किती गोडंस मुलगा आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहलं की, “लहान मुलं अशीच असतात त्यांना जे शिकवलं जातं तेच ते बोलतात करतात, हीच त्यांची निरागसता आहे.” आणखी एका युजरने लिहिले, “लहान आहे तो अजून”. या व्हिडीओवर लाइक्सचा पाऊस पडत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who killed ravana the childs funny answer to the question asked by the teacher funny video goes viral on social media srk