सध्या सोशल मीडियावर एकाच गाण्याची चर्चा आहे ते म्हणजे, ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’. या गाण्यावर साईराज केंद्रे याचा गोंडस व्हिडीओ पाहून सर्वांनाचा त्याचे कौतुक वाटतं आहे. साईराजचे मोहक हावभाव आणि गोंडस अभिनयामुळे तो रातोरात प्रसिद्ध झाला. हा व्हिडीओ एव्हाना जवळपास सर्वांनी पाहिला असावा पण तुम्हाला माहितीये का आमच्या पप्पांनी गणपती आणला’ कोणी गायले आहे? नाही, काळजी करू नका, आम्ही सांगतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की, ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाणं साईराजने गायले आहे पण तसे नाही. अनेकांना हे माहितचं नाही की, या गाण्याचे मुळ गायक हे माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे ही दोन भावंडे आहे. गेल्या वर्षी (२०२२) मध्ये दोघांनी हे गायलं होते. आहे. गणेशोत्सवाच्यावेळी हे गाणे गायले होते पण तेव्हा फारशी प्रसिद्धी नाही मिळाली. जेव्हा साईराज केंद्रे याने या गाण्यावर इंस्टाग्रामवर रिल्सवर व्हिडीओ पोस्ट केला तेव्हा हे गाणे पुन्हा चर्चेत आले.

हेही वाचा – “आमच्या पप्पांनी गणपती आणला”; चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तुम्हीही व्हाल त्याचे चाहते,पाहा व्हायरल व्हिडिओ

गेल्या वर्षभरात मिळाली नाही तेवढी प्रसिद्धी या गाण्याला साईराजच्या व्हिडीओनंतर मिळाली. या गाण्याला प्रसिद्धी जरी साईराजमुळे मिळाली असली तर शौर्य आणि माऊलीच्या निरागस आवाजाने देखील सर्वांना वेड लावले आहे. ज्या पद्धतीने त्यांनी हे गायले आहे ते पाहून सर्वांना दोघांचे कौतुक वाटत आहे.

या चिमुकल्यांचे वडील आणि काका मंगेश घोरपडे आणि मनोज घोरपडे यांनी मिळून हे गाणं तयार केलं. या गाण्याच्या व्हिडीओमध्येही त्यांचा शौर्या आणि माऊलीसह सहभाग दिसतो. सध्या इंस्टाग्राम, फेसबूक, युट्युबवर या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. साईराजचा अभिनय जितका गोंडस आहे तितकाच गोंडस आवाज शौर्या आणि माऊलीचा देखील आहे. हे गाणे रेकॉर्ड करतानाचा व्हिडीओ तुम्हाला युट्यूबवर पाहायला मिळेल.

हेही वाचा – ”आमच्या पप्पांनी गणपती आणला” फेम चिमुकला आहे तरी कोण? रातोरात झाला स्टार; नवा व्हिडीओ व्हायरल

ठाणे जिल्ह्यातील भिंवडी तालुक्यात राहणारे मनोज घोरपडे हे वडापाव विक्रेते आहेत. वडापावाची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मनोज यांनी आपला गाणी लिहण्याचा छंद जोपसला, त्यांनीच हे गाणे लिहिले. आपल्या मुलांकडूनच ते गाणे गाऊन घेतले. गेल्या वर्षी या व्हीडीओ २ मिलियन लोकांना पाहिला होता. मिळाले होते पण साईराजचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा प्रसिद्धीमध्ये आले आणि आतापर्यंत ७ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who sang amchya pappani ganpati anala song who is mauli and shaurya ghorpade original old singer and lyricist and far from fame snk