Viral video: बंधनात राहायला, बंधिस्त राहायला कुणालाच आवडत नाही. अगदी प्राण्यांनाही मोकळ फिरायला, वावरायला आवडतं. मात्र आपल्याला माहितीच आहे पाळीव प्राण्यांना कसं बांधून ठेवलं जातं. गाय असो म्हैस असो शेळी असो, अगदी कुत्र्यालाही बांधून ठेवतो आणि घराबाहेर. तुम्हीही तुमच्या प्राण्यांना बांधून ठेवत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की ते स्वत:ची सुटका करु शकत नाहीत, तर मग हा व्हिडीओ पाहा. तुम्हीही विचार करत असाल की प्राण्यांना काही समजत नाही तर, थांबा प्राण्यांनाही सगळं कळतं, तेही खूप हुशार असतात याचं एक उदाहरण सध्या पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गायीची बुद्धिमत्ता पाहून लोक थक्क

व्हायरल व्हिडिओमध्ये गायीला खुंटीला बांधलेले दिसत आहे. मात्र, या गायीला बांधलेले आवडत नाही. आता स्वातंत्र्य कोणाला आवडत नाही? माणूस असो वा प्राणी, प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं. असंच गाईलाही आता मुक्त व्हायचे होते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, गायीने पूर्ण ताकदीने खुंटी उपटून टाकण्याचे ठरवले होते. पण यामध्ये गाईने कोणतीही ताकद लावली नाहीतर स्मार्ट वर्क केलं, तिनं दोरी तिच्या शिंगात अडकवली आणि जोरात ओढली. क्षणात दोरी ओढल्याने मातीत अडकलेला खुंट बाहेर आला आणि गायीची सुटका झाली.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की खुंटीतून मुक्त होताच गाय इकडे तिकडे आनंदाने धावू लागली. गाईची खुंटीतून सुटका झाली तरी खुंटी तिच्या शिंगावर लटकत राहिली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक गायीचं कौतुक करत आहेत. एका युजरने म्हटले की, ‘प्राण्यांनाही मोकळे व्हायचे आहे.’ तर दुसऱ्या युजरने गाणंच म्हंटलं आहे ‘मी कशाला बंधनात राहू गं’. सोशल मीडियावर दररोज असे व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहिल्यानंतर क्वचितच कोणी म्हणेल की प्राण्यांना मेंदू नसतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> महाराष्ट्राच्या माजी शिक्षणमंत्र्यांचा एसी लोकलमध्ये अडचणींशी सामना; शेअर केलेला VIDEO एकदा पाहाच

असे मानले जाते की या पृथ्वीवरील सर्वात विचारशील आणि बुद्धिमान प्राणी मनुष्य आहे. मात्र, कधी-कधी प्राणी अशा गोष्टी करतात की त्यांना पाहून मानवालाही आश्चर्य वाटते. या व्हायरल व्हिडीओमध्ये गायीची बुद्धिमत्ता पाहून लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्राणी किती हुशार असतात हे लक्षात येतं.