Viral Video : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्यांना आपला आदर्श मानतात. महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालतात. त्यांचे विचार आत्मसात करतात. सोशल मीडियावर अनेक शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांचे प्रेम व आदर व्यक्त करताना दिसून येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं, याविषयी सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Auto Driver: मुंबईत घर, व्यवसायाने एजंट तरीही छंद म्हणून चालवतात रिक्षा; तरुणीला गोष्ट सांगत दिला त्यांनी ‘हा’ सल्ला; पाहा VIDEO

छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की विश्वास नांगरे पाटील एका कार्यक्रमात स्टेजवर भाषण देत आहे. भाषणादरम्यान ते एक किस्सा सांगतात, “व्हॉट्सअपवर मला एक मेसेज आला होता की छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं? जो पासष्ट किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव वेसाजी; जो दोन हजार सैन्याशी एकटा झुंजतो, त्याचं नाव बाजी; जो हात तुटला तरी शत्रुशी लढत राहतो, त्याचं नाव तान्हाजी; जो आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी; जो शत्रुच्या छावणीत घुसतो आणि शत्रुच्या छावणीचा कळस कापून आणतो, त्याचं नाव धनाजी, जो ढाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि एकटा उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याच्या नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी.”

डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटील ओळखले जातात. अनेक तरुण त्यांना आपला आदर्श मानतात. त्यांच्या भाषणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर लोक आवडीने बघतात.

हेही वाचा : VIDEO: रस्त्यावरून धावत होत्या गाड्या अन् १० सेकंदांत कोसळलं भलंमोठं झाड, सावरायलाही मिळाला नाही वेळ; भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद

पाहा व्हायरल व्हिडीओ, येथे क्लिक करा

https://www.instagram.com/reel/C9d-COYKAk_/?igsh=MWVuNncxemJmajNicQ%3D%3D

gavthi_comedy_wala या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला” तर एका युजरने लिहिलेय, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये “जय शिवराय” लिहिलेय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whom we call chhatrapati shivaji maharaj vishwas nangre patil video goes viral on social media ndj
Show comments