लालपरी महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. जनसामान्यांची ‘लालपरी’ अशी ओळख आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद वाक्य असलेल्या महाराष्ट राज्य परिवहन मंडळाची बस गेल्या ७६ पासून अविरतपण धावत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यच लालपरी धावताना दिसते. शहरात शिक्षणासाठी जाणाऱ्या तरुण मंडळींना, नोकरीसाठी गावातून शहराकडे वळलेल्या नोकरदार मंडळींना आणि सासरी केलेल्या माहेरवाशींना घरी परत घेऊन येणारी लालपरी सर्वांची लाडकी आहे. काळानुसार एसटी बसच्या रचनेत कालांतराने बदल होत गेले. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. आता प्रवाशांची संख्या इतरी वाढली आहे की उपलब्ध बससेची संख्या कमी पडत आहे.
एसटी महामंडाच्या लाल रंगाच्या गाड्यांपैकी अनेक बसे खराब झाल्याने त्यांचा वापर बंद झाला आहे. अशा परिस्थितीत महामंडाळ्याच्या साठ्यात अनेक नव्या बसचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान नव्या बसची रचना अत्ंयत विचित्र पद्धतीने केली असल्याचा दावा एसटी महामंडळाच्या एका चालकाने केला आहे.
लालपरीचा नवा व्हिडीओ चर्चेत
एसटी चालकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये एसटी महांमडाळीच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट झालेली बस दिसत आहे. सहसा बसमध्ये चढण्यासाठी चालकच्या बाजूला एक दरवाजा असतो आणि त्या दरवाज्याच्या अगदी खालीच पायऱ्या दिल्या जातात. पण नव्या बसमध्ये सर्वकाही उलट सुलट करण्यात आल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा – हौसेला वयाचे बंधन नाही! कशालाही न घाबरता आजीबाईंनी लुटला झीपलाईनचा आनंद, पाहा Viral Video
व्हिडीओमध्ये एसटी बसचा चालक एसटी बसची रचना कशी चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे हे दाखवतो.
चालक दाखवतो की, बसमध्ये चढण्यासाठी चालकाला पायऱ्यांची आवश्यकता असते पण नव्या बसमध्ये या पायऱ्या चक्क पुढील (जिथे चालक बसतो तिथे) चाकाच्या पुढील भागेत दिल्या आहेत पण तिथे दरवाजा दिलेला नाही. उलट दरवाजा चाकाच्या मागील बाजूला दिला आहे पण तिथे चालकाला बसमध्ये चढण्यासाठी पायऱ्याच दिलेल्या नाही. चालक पायऱ्यांवर चढतो आणि या पायऱ्या चुकीच्या ठिकाणी दिल्या आहेत हे दाखवतो तसेच तो दरवाजा उघडून दाखवतो जिथे पायऱ्याच नाही आणि म्हणतो की, तुम्हीच सांगा आता बसमध्ये चढायचे कसे”
व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले
व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना देखील हसू आवरत नाही. अनेक लोक हा व्हिडिओ शेअर करत परिवहन महामंडळला टॅग करून जाब विचारत आहे तर अनेकांनी मजेशीर कमेंट करत परिवहन महामंडाळाची खिल्ली उडवली आहे.
एकाने कमेंट केली की, “काकांचा व्हिडिओ ट्रेंडिंगला जोमात ., परिवहन महामंडळ कोमात “
दुसऱ्याने कमेंट केली की,” बहुतेक आधी पायऱ्या बनवल्या आणि नंतर दरवाजा बसवला असावा!”
तिसऱ्याने कमेंट की,”जसे प्रवासी खिडकीतून आत जातात तसे प्रवेश करतात तसे चढा.
व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी दावा केला की, या पायऱ्या काचा पुसण्यासाठी केल्या आहेत तर दरवाजा आपत्तकालीन स्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी बनवला आहे.