रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटोकोरपणे पालन केले पाहिजे हे माहिती असूनही अनेक बेशिस्त चालक वाहन वाहतूक नियमांचे पालन करत नाही. बेशिस्त चालकांमुळे अनेकदा रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असतात. आपली एखादी चूक कोणाच्यातरी जीवावर बेतू शकते याचीही जाणीव त्यांना नसते. सोशल मीडियावर अशा अपघताचे कित्येक व्हिडिओ समोर येतात सध्या अशाच एका घटनेचा सीसीटीव्ही फुटेज चर्चेत आला आहे. एका बेशिस्त दुचाकीस्वाराने सायकल चालकाला धडक दिल्याचे दिसते आहे. बेशिस्त दुचाकीचालकाला सायकलचालकाने कशी अद्दल घडवली हे व्हिडीओमध्ये बघा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायकलला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराला अशी घडवली अद्दल

व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला, भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीचालक रस्त्याच्या बाजून जाणाऱ्या सायकलचालकाला धडक देतो. धडक इतकी जोरात असते की सायकस्वार सायकलवरून खाली पडतो. सायकल बाईकच्या चाकाखाली अडकते आणि काही अंतर फरफटत जाते. बेशिस्त दुचाकी चालकाला थेट सायकलला पाय मारून ढकलून देतो. सायकलचालक पायाला दुखापत झाल्याने लंगडत लंगडत येतो. त्यानंतर दुसरा व्हिडिओ दिसत आहे ज्यामध्ये सायकलचालक रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे दिसते. तो त्याच दुचाकीस्वाराची वाट पाहात तेथे उभा असतो. जसा बेशिस्त दुचाकीस्वार त्याला दिसतो तशी त्याच्या अंगावर उडी मारून तो बाईकसह जमिनीवर खाली पाडतो आणि त्याला लाथा मारतो अन् बेशिस्त दुचाकीचालका बदला घेतो.

https://www.instagram.com/bollycut__/reel/DFFdjViPMxC

व्हिडिओ सोशल मीडियावरbollycut_ नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

व्हिडिओ पाहून काहींनी सायकलचालकाची बाजू घेतली आणि बेशिस्त दुचाकीचालकाला अद्दल चांगली अद्दल घडवली असे म्हटले तर काहींनी सायकल स्वाराने जे केले ते अत्यंत चुकीचे आहे असे मत व्यक्त केले.

एकाने म्हटले “कर्मा”,

दुसऱ्याने सायकलचालकच्या वागणे चुकीची असल्याचे सांगत म्हटले की,(दुचाकीस्वाराकडून जे घडले ) तो अपघात होता, पण सायकलचालकाने जे केले ते स्वच्छेने केले.”

तिसऱ्याने कमेंट केली की,” तरीही त्यालाबाईकवरून पाडणे योग्य नव्हते, त्याचे डोके रस्त्यावर आपटता आपटता वाचले.”