Viral Video of Driver Abandoning Bus : महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. मुंबईमध्ये नेहमीच अशा घटना घडतात ज्या सर्वांचे लक्ष वेधून घेताता. मग मुबंईतील लोकलचा प्रवास असो किंवा मुंबईतील बसचा प्रवास असो. सोशल मीडियावर मुंबई लोकल प्रवासा दरम्यानचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात जिथे कधी प्रवाशांची प्रचंड गर्दी, जीव धोक्यात घालून प्रवास करणारे प्रवासी, चालत्या लोकल पकडण्याच्या नादात झालेले अपघात, किंवा लोकलमध्ये डान्स करणारे किंवा गाणी गाणाऱ्या लोकांचे कित्येक व्हिडिओ समोर येत असतात.

पुण्याप्रमाणे मुंबईतही वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे अनेक वाहन चालक आहेत ज्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात होत असतात. सध्या अशाचा एका घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे, ज्यामध्ये मुंबईतील बस म्हणजेच बेस्टची बस दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये वाद होतो पण या वादानंतर बस चालक जे करतो ते पाहून सर्वांना धक्का बसला आहे.

रागाच्या भरात बस सोडून निघून गेला चालक (Bus Driver Leaves Bus in Traffic)

गोरेगाव पश्चिम मेट्रो स्टेशनजवळील नवीन लिंक रोडवर ही घटना घडली आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एक बसचालक आणि दुचाकी चालक यांच्यामध्ये वाद सुरु आहे. एक हेल्मेट परिधान केलेला व्यक्ती बसच्या दाराजवळ उभा आहे आणि बस चालकाशी वाद घालत आहे. काही क्षण दोघांमध्ये शा‍ब्दिक वाद होतो आणि त्यानंतर संतापलेला बसचालक जे करतो ते पाहून सर्वजण पाहातच राहतात. बसचालक आपली बस आणि हेल्मेट हातात घेतो आणि बस भररस्त्यात सोडून निघून जातो. बस मध्येच थांबल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीतही बसचालक तेथून निघून जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्हीच सांगा चूक कोणाची?

इंस्टाग्रामवर icapturemumbaii नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘वाहतूक कोंडी गेली खड्यात, मी तर चाललो. गंमत सोडा पण या परिस्थितीला जबाबदार कोण? गोरेगाव पश्चिम मेट्रो स्टेशनजवळील नवीन लिंक रोडवर ही घटना घडली आहे.’ असे कॅप्शन व्हिडिओ शेअर करताना दिले आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी बसचालकाच्या प्रतिक्रियेचे समर्थन झाले आहे तर काहींनी हे वागणे योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

येथे पाहा Video

नेटकरी काय म्हणाले?

एकाने कमेंट केली की, “वाद घालण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे, फक्त तुमची बॅग आणि हेल्मेट घ्या आणि निघून जा.”

दुसऱ्याने कमेंट केली की, “चालकाने जे केले ते योग्य आहे” त्यावर एकाने उत्तर दिले की, “नाही त्याची चूक आहे, बस थोडी बाजूला लावायला पाहिजे होती.”

तिसऱ्याने प्रश्न विचारला की, “त्याचवेळी येथे अँब्युलन्स आली तर”

चौथ्याने कमेंट केली की, “ड्रायव्हर रॉक्स पब्लिक शॉक “

पाचव्याने कमेंट केली, “त्याने वाद घालण्यापेक्षा शांतपणे निघून जाणे निवडले”

Story img Loader