Viral video: सोशल मीडिया हे माहितीचं भंडार आहे. इथे अशा काही गोष्टी पाहायला किंवा ऐकायला मिळतात की कधीकधी त्यामुळे धक्काच बसतो. तर कधीकधी इथे मीम मटेरीयल देखील व्हायरल होतं, ज्याला कधी लोक डोक्यावर घेतात तर कधी ट्रोल करतात. सध्या मुलांच्या लग्नाचा विषय फारच गंभीर होत चाललाय. हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. स्वभाव, कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती-नोकरी, पगार, गाडी, स्वतःचं घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत असतात. नणंद, दीर नको, सासू-सासऱ्यांपासून नवरा वेगळा हवा, त्याचा पुण्या-मुंबईत फ्लॅट हवा, अशा अपेक्षा सध्या मुलींसह पालकांकडून व्यक्त होत आहेत. ‘असलाच नवरा पाहिजे हं…’ अशा मानसिकतेच्या मुलींमुळे अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सर्वच समाजांत मुलींचे प्रमाण घटत आहे. अशातच मुलींचे शिक्षण वाढत असल्याने अनेक मुलींना आपल्याला अनुरूप मुलगाच हवा असतो. या वाढत्या अपेक्षेमुळे मात्र अल्पशिक्षित मुलांवर अविवाहित राहण्याची वेळ येते. मात्र कधी कधी मुलींच्या अपेक्षा नको तेवढ्या असतात. आता तर गावच्या मुलीही म्हणतात नवरा शहरातलाच असावा. पण का यामागे काय कारण असावी याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये गावातल्या मुलींना शहरातली मुलं जास्त का आवडतात? हे काही मुलींनी सांगितलं आहे. या मुलींची उत्तर ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल तर काही उत्तर ऐकून डोक्याला हात लावाल.

pune metro
पुणेकरांचा नादखुळा! पुणे मेट्रोतून प्रवास करताना तरुणांनी केले असे काही, Viral Video पाहून पोटधरून हसाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
Kalyan Viral Video
“कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाहीय”, कल्याण स्टेशनवरचा ‘तो’ जीवघेणा प्रकार पाहून धक्का बसेल; VIDEO एकदा पाहाच!
Spontaneous response to exhibition of Shiva era weapons in Karad
शिवकालीन शस्त्रे पाहताना आबालवृद्ध भारावले, कराडमधील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
puneri pati married life
“पत्नी ही अर्धांगिनी आहे…”हातात पाटी घेऊन पुणेकर तरुणाने सांगितला सुखी संसाराचा कानमंत्र! पाहा Viral Video
Vishwas Nangare Patil told amazing poem of Suresh Bhat
Video : “कधीही हरल्यासारखे वाटेल तेव्हा हे ऐका” विश्वास नांगरे पाटील यांनी सादर केली सुरेश भटांची ही अप्रतिम कविता
Students brave rope trolleys to reach school in Uttarakhand; viral video sparks outrage
खाली खळखळ वाहणारी नदी, एक दोरखंड अन् ट्रॉलीच्या भरोशावर….शाळकरी मुलींचा जीवघेणा प्रवास, Viral Video

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पहिली मुलगी सांगते, शहरातली मुलं फार फॅशनेबल राहतात त्यांच ड्रेसिंग सेन्स चांगला असतो. त्यामुळे शहरातली मुलं जास्त आवडतात. दुसरी मुलगी म्हणतेय, गावाकडच्या मुलांचा ड्रेसिंग सेंस फार खराब असतो तसंच त्यांना कुठे कसं वागायचं याबद्दलची समज नसते. तिसऱ्या मुलीनं मात्र अगदी खरं खरं न लाजता सांगितलंय की, गावाकडच्या मुली शहरातले नवरे शोधतात. कारण त्यांना शहरात राहायचं असतं, रोज शेतावर जाऊन काम करा, खुरपायाला जायचं नसतं. परत मग चुलीवर जेवण करा, भाकऱ्या खा, भाकऱ्या थापा ही सगळी काम तिला करायची नाही त्यामुळे शहरातला मुलगा पाहिजे म्हणते. आता या झाल्या भरपूर अपेक्षा असणाऱ्या मुली. दरम्यान आणखी मुलींनी गावाकडच्या मुलांची बाजू देखील घेतली. एक मुलगी म्हणाली, गावाकडची मुलं शहरातल्या मुलांपेक्षा मुलींचा आदर जास्त करतात. तर दुसरी म्हणाली, शहरातली मुलं जॉबलेस असतात. त्यामुळे गर्लफ्रेंडच्या एका इशारावर ते धावत येतात. गावाकडची मुलं दिसायला सुंदर नसतात पण मनानं सुंदर असतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच

सोशल मीडियावर हा व्हिडीओ viralinmaharashtra या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader