वाहतूकीचे नियम वाहनचालकांच्या सुरक्षेसाठीच बनवलेले असतात. वाहनचालकांनी या वाहतूक विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केलं तर वाहनधारकांसह रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांचेही संरक्षण होते. त्यामुळे वाहतूक पोलिस सतत आपल्याकडून या नियमांचे पालन करुन घेत असतात. आजकाल पोलिसांनी नागरिकांना केलेला दंड किंवा वाहतूकीचे नियम सांगण्यासाठी वापरलेल्या अनोख्या पद्धतींचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पोलिस अधिकारी मुलींना हेल्मेट घालण्यासाठी सांगत आहेत. यावेळी व्हिडीओ रेकॉर्डींग सुरु असल्याचं पाहताच या मुली लाजल्याचं व्हिडीओत दिसत आहे. व्हिडीओमध्ये स्कूटीवर बसलेल्या दोन मुली रस्त्याच्या कडेला असलेल्या एका फास्ट फूडच्या गाड्याजवळ थांबल्याचं दिसत आहेत. यावेळी त्यांना एक पोलिस अधिकारी, ‘हेल्मेट का घातलं नाही?’ असं विचारतात, शिवाय तुम्हाला दंड करु का? असं विचारताच त्या मुली लाजून मान हलवत नको असं म्हणत आहेत. तर आपण हेल्मेट का नाही घातलं याबाबत मुलींनी पोलिसांना दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.
हेही वाचा- ‘बायको सतत फोन कट करतेय, कृपया सुट्टी द्या…’, पोलिसांने लिहिलेला रजेचा अर्ज होतोय Viral
मात्र, या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, पोलिस अधिकारी मुलींशी प्रेमाने वागवतात आणि मुलांवर रागवतात असा आरोप काही मुलांनी केली आहे. व्हिडीओत, फास्ट फूडच्या गाड्याजवळ दोन मुली स्कूटी घेऊन उभ्या असलेल्या दिसत आहेत. दरम्यान, वाहतूक पोलिसांसह एक पोलिस अधिकारी त्यांच्याकडे जातो आणि मुलींना, ‘तुम हेल्मेट का घातलं नाही?’ असं विचारतात, त्यावर ती मुलगी हसत हसत आम्ही इथूनच आल्याचं सांगते. यावर अधिकारी म्हणतात, यमराजही इथेच झाडावर बसले असतील तर अडचण होईल ना?, यानंतर तुमचं चलन काढू का? असं विचारताच मुलगी नको म्हणत मान हलवतो आणि लाजते.
हा व्हिडिओ @vikendra_sharmaनावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ‘हेल्मेटशिवाय स्कूटी चालवल्याबद्दल बदायूमध्ये किती मुलींना चलन देण्यात आली? याची काही आकडेवारी आहे का? फक्त मुलांनाच दंड केला जातो, पोलिस कधी मुलांशी प्रेमाने बोलतात का? अजूनही मुलगा-मुलगी असा भेदभाव केला जात आहे.’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं आहे की, ‘या ठिकाणी मुलगा असता त्याच्याकडून त्याच्याकडून नक्कीच चलन घेतलं असते.’ तर आणखी एकाने म्हटलं आहेस मुलींशी प्रेमाने वागावे लागते, नाहीतर त्या रडायला सुरुवात करतात.’