सध्या चीनमध्ये मीठाच्या खरेदीसाठी नागरिकांनी धावपळ सुरु केली आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चीनमध्ये लोक अनेक मोठ्या स्टोर्समधून मिठाच्या पोतीच्या पोती खरेदी करत आहे. काही ठिकाणी तर मीठ खरेदीसाठी दुकानात नागरिकांची झुंबड उडाल्याची दिसत आहे. मिठाच्या पोती दुकानामध्ये डिस्पेला लावण्याआधीच सर्व पोत्या संपत आहेत. काही तासांत चीनमध्ये मिठाची मागणी इतकी वाढली की त्याच्या किंमतींमध्ये ३०० टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. या परिस्थितीत सरकारला हस्तक्षेप करुन निवेदन जारी करण्याची वेळ आली. यात सरकारने लोकांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. पण चीनमधील नागरिक मिठासाठी एवढी धावपळ का करत आहेत जाणून घेऊ….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जपानने गुरुवारी त्यांच्या फुकुशिमा अणु प्रकल्पातील सुमारे २००० दशलक्ष लीटर विषारी पाणी प्रशांत महासागरात सोडण्याची घोषणा केली. जपान ह पाणी अनुऊर्जा प्रकल्पातील अणुभट्ट्या थंड ठेवण्यासाठी वापर होते. पण आता चीन आणि दक्षिण कोरियाला अशी भीती आहे की, जपान सोडत असलेल्या पाण्यात किरणोत्सर्गी किरणोत्सर्ग असू शकतात. यातील किरणोत्सर्ग लोकांसाठी अतिशय हानीकारक ठरु शकतो. कारण चीन याच समुद्राच्या पाण्याचा वापर करत मीठ बनवते. यामुळे मीठ उत्पादन अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. पण ही बातमी लोकांपर्यंत पोहोचताच त्यांनी बाजारपेठ गाठत तातडीने मिठाची खरेदी करण्यास सुरुवात केली.

चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, या परिस्थितीसंदर्भात चायना सॉल्टच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ज्यात सरकारी कंपनीने मान्य केले की, अनेक लोक घाबरुन मीठ खरेदी करत आहेत. त्यामुळे दुकानात आणि बाजारपेठेत मिठाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाही चीनच्या बीजिंग आणि शांघायसारख्या शहरांमध्ये लोक मीठ खरेदीसाठी रात्रभर रांग लावून उभे असल्याचे दृश्य आहे.