डॉक्टर म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे डॉक्टरांनी परिधान केलेला पांढरा कोट आणि त्यांच्या गळ्यात अडकवलेलं स्टेथोस्कोप. रुग्णालयामध्ये गेल्यावर डॉक्टर आपल्याला कायम पांढऱ्या कोटमध्ये दिसून येतात. मात्र डॉक्टर किंवा तेथे काम करणारे कर्मचारी कायम पांढऱ्याच कपड्यांमध्ये का दिसतात हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. परंतु डॉक्टर आणि इतर कर्मचारी असे कपडे परिधान करण्यामागे एक खास कारण आहे. चला तर मग जाणून घेऊयात या मागचं खरं कारण –
१. रुग्ण आणि डॉक्टर किंवा रुग्णालयातील अन्य कर्मचारी यांच्यातील फरक ओळखता यावा यासाठी रुग्णालयातील कर्मचारी पांढऱ्या कोटचा वापर करत असतात.
२. पांढरा रंग शांती, पवित्रता आणि प्रामाणिकपणाचं प्रतिक आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये कायम सकारात्मक वातावरण असावा यासाठी या रंगाला प्राधान्य देण्यात येतं.
३. त्याप्रमाणेच जंतूसंसर्ग होऊ नये यासाठीदेखील पांढऱ्या रंगाचा उपयोग होतो.
४. पांढऱ्या रंगामुळे शरीराचं तापमान स्थिर राहतं. त्याप्रमाणेच पांढरा रंग स्वच्छतेचंदेखील प्रतिक आहे.
५. विशेष म्हणजे पांढऱ्या कोटासोबतच त्याला असलेले मोठे खिसेदेखील महत्वाचे असतात. या खिशांमध्ये डॉक्टरांना आवश्यक असलेलं सामान ठेवता यावं यासाठी हे खिसे मोठे ठेवण्यात येतात.
दरम्यान, सध्याच्या काळामध्ये डॉक्टरांची ओळख पांढरा कोट म्हणूनच झाली आहे. मात्र हा पांढरा कोट नसून त्याला अॅप्रिन असं म्हटलं जातं. हा अॅप्रिन गुडघ्यापर्यंत लांब असून तो सूती, लिनन किंवा सूती पॉलिएस्टर यांच्यापासून तयार केलं जातो.