‘Human Washing Machine :आपल्या शरीराच्या स्वच्छतेसह अनेक कारणांसाठी अंघोळ अत्यंत महत्त्वाची असते. पण अनेकांना अंघोळ करण्याचा खूप कंटाळा येतो. पण आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. जपानी इंजिनिअरने त्यावरही तोडगा शोधला आहे. आतापर्यंत तुम्ही कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरली जात असल्याचे ऐकले असेल पणा आता माणसांना धुणारी मशीनही देखील बाजारात येणार आहे.

‘मिराई निन्गेन सेंटाकुकी’ ही मानवी वॉशिंग मशीन आहे. शॉवरहेड्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या ओसाका स्थित कंपनी सायन्स कंपनीने ही मशीन तयार केली आहे. हे फ्युचरिस्टिक पॉड त्याच्या काही फंक्शन्ससाठी AI वापरून तुम्हाला फक्त १५मिनिटांत अंघोळ करून कोरडे करण्याची सुविधा देण्याचे वचन देते.

Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
bmc launched cleanliness drive to clean Mumbai
महापालिकेने घेतला शहर स्वच्छतेचा वसा, दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेचा निर्णय
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO
buldhana hair loss loksatta news,
पाण्यामुळे नव्हे, ‘फंगस’मुळे केस गळती… आता खुद्द मंत्रीच म्हणाले, बिनधास्त आंघोळ…
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…
Mobile bathroom for women in Kandivali
कांदिवलीत महिलांसाठी फिरते स्नानगृह; भारतातील पहिलेच मोबाइल बाथरूम
mind reading machine china
मनकवडं मशीन अवतरलं, फायदा होणार की गडबड?

हेही वाचा – कॉलेजमध्ये ज्या आवाजावर हसायचे, त्याच आवाजाने दिली रेल्वेत नोकरी! महिलेच्या आवाजात घोषणा करणारा हा तरुण आहे तरी कोण?

ते कसे कार्य करते?
फायटर जेट कॉकपिट आणि तुमच्या लाँड्री मशीन एकत्र करून केलेल्या एका डिव्हाइसची कल्पना करा. तुम्ही या प्लॅस्टिक पॉडमध्ये प्रवेश करता जे कोमट पाण्याने भरलेले आहे आणि मग जादू सुरू होते.लहान सूक्ष्म बुडबुड्यांनी भरलेल्या पाण्याचे शक्तिशाली जेट्स( हाय-स्पीड जेट ) तुमची त्वचा पूर्णपणे स्वच्छ करतात, साबण किंवा स्क्रबिंगची आवश्यकता न ठेवता ते त्वचेची सफाई करतात. विशेष म्हणजे याच तंत्रज्ञानाचा वापर संवेदनशील इलेक्ट्रॉनिक घटक हलक्या हाताने साफ करण्यासाठीही केला जातो.

पण इथे एक ट्विस्ट आहे: हे फक्त झटपट स्वच्छता करण्यासाठी नाही. पॉडच्या खुर्चीमध्ये( pod’s chair ) आधीपासून इलेक्ट्रोड उपलब्ध असतात जे जैविक डेटाद्वारे तुमच्या मूडचे निरीक्षण करतात. AI पाण्याचे तापमान बदलते आणि तुम्हाला आराम मिळण्यास मदत करण्यासाठी शांत व्हिज्युअल प्ले करते.

हेही वाचा – ‘२०० रुपये जास्त मागितले, माराहाण करण्याची दिली धमकी’, रिक्षावाल्याने २० वर्षीय तरुणाला छळले, धक्कादायक घटनेचा Video Viral

जर हे भविष्यवादी वाटत असेल, तर प्रत्यक्षात ही एक ५० वर्ष जुनी कल्पनेचा पुनर्जन्म आहे. मूळ संकल्पना Sanyo Electric Co. ( जी आता Panasonic म्हणून ओळखली जाते) या कंपनीकडून आली आहे, ज्यांनी १९७०च्या वर्ल्ड एक्स्पोमध्ये त्यांची आवृत्ती प्रदर्शित केली होती. पण ते मॉडेल कधीच बाजारात आले नाही. ओसाका कानसाई एक्स्पोमध्ये अद्ययावत मशीनचे अनावरण करून, Science कंपनीने ते बदलण्याचा निर्धार केला आहे. भाग्यवान ग्राहकांना पॉडची चाचणी देखील करता येऊ शकते. १००० लोकांना ते वापरून पाहण्याची अपेक्षा आहे.

आत्तासाठी, तुम्ही तुमचे स्वतःचे ह्युमन वॉशिंग मशिन केव्हा खरेदी करू शकाल याबद्दल काहीही सांगता येणार नाही. परंतु जर तुम्ही वेळेची बचत करणाऱ्या आणि तुम्हाला मिनी स्पा ट्रीटमेंट देणाऱ्या उपकरणाचे स्वप्न पाहिले असेल, तर या पॉडची वाट पाहणे योग्य ठरेल.

Story img Loader